Income Tax Refund Saam tv
बिझनेस

Income Tax Refund: आयकर रिफंड अजूनही जमा झालेला नाही? ही असू शकतात कारणे

Why Income Tax Refund Delay Know the Reasons: आयकर रिफंड जमा होण्यास सुरुवात झाली आहे. २० दिवसांत करदात्यांना रिफंड मिळतो. परंतु काही कारणांनी रिफंड येण्यास उशिर होऊ शकतो.

Siddhi Hande

आयटीआर भरुनही रिफंडचे पैसे जमा झाले नाहीत?

रिफंड न जमा होण्यामागची कारणे

कधीपर्यंत करदात्यांच्या खात्यात जमा होणार रिफंड

आयटीआर फाइल करण्यासाठी शेवटचे काही दिवस उरले आहेत. तुम्ही १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत आयटीआर फाइल करु शकतात. देशातील कोट्यवधी करदात्यांनी आयटीआर फाइल केले आहेत. यातील काही करदात्यांना रिफंड मिळाले आहेत. तर काही करदात्यांना अजून रिफंड आले नाही. परंतु तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही. लवकरच तुमच्या खात्यात रिफंडचे पैसे जमा होतील.

दरम्यान, रिफंड येण्यास उशिर होणे हे सामान्य आहे. अनेकांनी रिटर्न व्यवस्थित फाइल केले आहेत आणि वेळेवर वेरिफाय झाल्यानंतर ७ ते १५ दिवसांत तुम्हाला पैसे मिळतील. काहीवेळा तुम्हाला लगेच पैसे येतात. दरम्यान, रिफंड येण्यास उशिर का होतो यामागची कारणे जाणून घ्या.

रिफंड होण्यास उशिर का होतो?

चुकीचे बँक डिटेल्स

तुम्हाला आयटीआर फाइल करताना खाते क्रमांक, IFSC कोड याची माहिती द्यावी लागते. जर यात काही चुका असतील तर तुम्हाला पैसे रिफंडचे पैसे येण्यास उशिर होईल.

आयटीआर आणि फॉर्म 26AS/AIS मधील तफावत

आयकर विभाग सर्व करदात्यांना 26AS/AIS फॉर्म देते. यामध्ये सर्व माहिती असते. जर तुम्ही आयकर भरताना काही माहिती सांगितली नसेल किंवा टीडीएस क्रेडिटची चुकीची माहिती दिली तर रिफंड येण्यास उशिर होईल.

आयटीआर व्हेरिफिकेशन होणार नाही

आयटीआर फाइल केल्यानंतर ते वेरिफाय होणेदेखील गरजेचे आहे. तुम्ही ई-व्हेरिफिकेशन केल्याशिवाय रिटर्न प्रोसेस होणार नाही त्यामुळे रिफंड मिळणार नाही.

विभागीय चौकशी

काही प्रकरणांमध्ये आयकर विभागाला संशय आला की, रिटर्नमध्ये मोठी रक्कम दावा करण्यात आली आहे किंवा त्यामध्ये काही तफावत असू शकते. तर रिटर्न चौकशीसाठी पाठवले जाईल. यामुळे रिफंड येण्यास उशिर होईल.

थकबाकी

जर तुमच्याकडे पूर्वीचे कर थकबाकी असेल तर नवीन परतावा त्या बदल्याक अॅडजस्ट केला जाऊ शकतो. या परिस्थिती विभाग त्यांना नोटीस पाठवतो. त्यामुळे रिफंड येण्यास उशिर होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj jarange patil protest live updates: न्यायालयाच्या नियमांचे पालन करा, जरांगे पाटलांचं मराठा आंदोलकांना आवाहन

Maratha Reservation: खाऊगल्ली का बंद होती? व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवण्यावरुन मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

John Cena: जॉन सीना WWE मधून घेणार निवृत्ती? कधी खेळणार शेवटचा सामना?

Horoscope Tuesday: या राशीने वाद टाळा, काही राशींना प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल; वाचा उद्याचे राशीभविष्य

Maratha Reservation: चर्चेला कोणी समोर आलं तर लवकर मार्ग काढू; आंदोलनाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT