ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जॉन सीना लवकरच त्याच्या 23 वर्षांच्या यशस्वी WWE कारकिर्दीला निरोप देणार आहे.
WWE मध्ये जॉन सीना त्याचा शेवटचा सामना कधी आणि कोणत्या दिवशी खेळणार आहे, जाणून घ्या.
जॉन सीनाच्या शेवटच्या सामन्याची तारीख जाहीर झाली आहे.
जॉन सीना या वर्षी 13 डिसेंबर रोजी WWE रिंगमध्ये त्याचा शेवटचा सामना खेळेल.
जॉन सीना हा शनिवार, १३ डिसेंबर २०२५ रोजी 'सॅटरडे नाईट मेन इव्हेंट' विशेष कार्यक्रमात शेवटच्या वेळी रिंगमध्ये उतरणार आहे.
जॉन सीना हा WWE चा सर्वात मोठा रेसलर आहे. तो त्याच्या कारकिर्दीत 17 वेळा विश्वविजेता बनला, जो एक विक्रम आहे.
जॉन सीनाने 2002 मध्ये स्मॅकडाउनकडून WWE चा पहिला सामना खेळला.