ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लोक निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी जिममध्ये जातात. बरेच लोक जिममध्ये २ तास व्यायाम करतात आणि बरेच जण त्यापेक्षा जास्त वेळ व्यायाम करतात.
फिटनेस राखण्यासाठी दिवसातून किती तास जिममध्ये जाऊन व्यायम करणे योग्य आहे? जाणून घ्या.
तज्ज्ञांच्या मते, आठवड्यातून १५० मिनिटे शारीरिक हालचाली करून तंदुरुस्त राहता येते. हा वेळ तुम्ही कोणत्या प्रकारचा व्यायाम करत आहात यावर अवलंबून असतो.
आपण दररोज ५ दिवस ३० मिनिटे व्यायाम करून तंदुरुस्त राहू शकतो. पण यासाठी दररोज व्यायाम केला पाहिजे.
दररोज ३० मिनिटे व्यायाम करणे हे क्रोनीकल डिसीज टाळण्यासाठी, मूड सुधारण्यासाठी, स्नायूंसाठी आणि चांगली झोप घेण्यासाठी पुरेसे आहे.
काही तज्ञ म्हणतात की, जर तुम्ही आठवड्यातून फक्त ३ दिवस वेळ काढू शकत असाल तर तुम्ही किमान ६० मिनिटे व्यायाम केला पाहिजे.
जर तुम्ही रनिंग, सायकलिंग किंवा हाय इन्टेंसिटी व्यायाम करत असाल तर आठवड्यातून ७५ मिनिटे व्यायाम पुरेसा आहे.