Income tax department Action On L&T Company 
बिझनेस

IT Action On L&T Company: आयकर विभागाची L&T वर कारवाई, सोमवारी शेअर मार्केट कोसळणार?

Income tax department: आयकर विभागाने एल अँड टी कंपनीवर कारवाई केलीय. एल अँड टी कंपनी भारतातील 27 अब्ज डॉलरची बहुराष्ट्रीय कंपनी आहे.

Bharat Jadhav

मुंबई: आयकर विभागाने एल अँड टी कंपनीवर कारवाई केलीय. लार्सन अँड टुब्रो कंपनीवर आयकर विभागाने 4.68 कोटी रुपयांचा दंड आकारलाय. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आदल्या दिवशी शेअर बाजारात मोठी उसळी घेईल अशी आशा आहे. त्याचवेळी आयकर विभागाने एल अँड टीवर केलेल्या कारवाईमुळे शेअर मार्केटवर काही प्रमाणावर परिणाम करण्याची शक्यता आहे.

आयकर विभागाने आहे. हा दंड खूप जरी नसला तरी उद्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कंपनीने शनिवारी शेअर बाजाराला ही माहिती दिलीय. एल अँड टी हाइड्रोकार्बन इंजीनियरिंग लिमिटेड या आधीच्या कंपनीवर कर कार्यवाहीसंबंधी प्रकरणात 4,68,91,352 रुपयांचा दंड आयकर विभागाने ठोठावला आहे. या कंपनीचे एप्रिल 2021 मध्ये एल अँड टीमध्ये विलिनीकरण झाले होते. आता या दंडावर कंपनीनं अपिल दाखल करणार असल्याचं म्हटलंय.

एल अँड टी कंपनी भारतातील 27 अब्ज डॉलरची बहुराष्ट्रीय कंपनी आहे. अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (EPC) प्रकल्प, आयटी आदी क्षेत्रामध्ये या कंपनी कार्यरत आहे. लार्सन अँड टुब्रोच्या शेअरमध्ये गेल्या काही काळापासून वाढ होतेय. शुक्रवारी हा शेअर 43 अंकांनी वाढून बंद झाला होता. सध्या हा शेअर 3,678.50 च्या पातळीवर आहे. गेल्या एका महिन्यात हा साठा ५ टक्क्यांहून अधिक वाढलाय. गेल्या 6 महिन्यांत शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 11 टक्क्यांहून अधिक परतावा मिळालाय. त्यामुळे या कारवाईमुळे मार्केटवर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT