आयबीपीएस आरआरबी भरती २०२५ अंतर्गत १३,२१७ पदांसाठी मोठी घोषणा.
लिपिक आणि पीओ या पदांसाठी उमेदवारांना संधी.
अर्ज प्रक्रिया www.ibps.in वरुन सुरू आहे.
IBPS RRB Notification 2025 : सरकारी बँकेत नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने १३,००० हून अधिक पदांसाठी बंपर भरतीची घोषणा केलीय. आयबीपीएस दरवर्षी पीओ आणि ऑफिस असिस्टंटची पदे भरण्यासाठी IBPS आरआरबी परीक्षा घेते असते.
आताही तब्बल १३,००० हजार पदे भरली जाणार आहेत. मग काय वेळ न घालवता त्वरीत अर्ज करा. या नोकरीसाठी अर्ज कसा करायचा? कोण पात्र आहे, अर्ज कुठे पाठवायचा बाबतची सर्व माहिती आपण जाणून घेऊ. IBPSने प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये (आरआरबी) लिपिक (कार्यालय सहाय्यक), प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ), ऑफिसर स्केल II आणि ऑफिसर स्केल III या विविध श्रेणींमध्ये एकूण १३,२१७ पदांसाठी भरती जाहीर केलीय. या पदांसाठी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालीय.
जे इच्छुक आणि पात्र उमेदवार आहेत, ते IBPS च्या अधिकृत वेबसाइट www.ibps.in वर सूचना तपासून ऑनलाइन अर्ज करू शकतात. आयबीपीएसने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार आरआरबी पीओ आणि क्लर्क २०२५ भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०२५ असणार आहे.
देशभरातील प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये (RRB) प्रोबेशनरी ऑफिसर्स (PO), ऑफिसर स्केल 2 आणि 3 आणि ऑफिस असिस्टंट (लिपिक) साठी या भरती श्रेणीनुसार केली जाणार आहे. एकूण भरतींपैकी लिपिक पदासाठी ७,९७२ आणि पीओ पदासाठी ३,९०७ भरती जाहीर करण्यात आल्यात. जे उमेदवार पदवी उत्तीर्ण आहेत, ते २१ सप्टेंबरपर्यंत ibps.in वर अर्ज सादर करू शकतात.
IBPS RRB अर्ज भरताना त्यांना त्यांच्या पसंतीच्या बँक आणि पदांचा उल्लेख करण्यास सांगण्यात आलंय. त्यामुळे भरतीचे तपशील तपासून घेणं आणि योग्य निर्णय घेणे महत्वाचे आहे. IBPSने प्रत्येक राज्य, बँक आणि श्रेणीसाठी स्वतंत्रपणे १३,२१७ पदांसाठी भरती जाहीर केलीय. यामुळे उमेदवार त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी आणि पात्रतेनुसार अर्ज करू शकतील.
या नोकरीबाबत अधिकची माहिती जाणून घ्यायची असेल तर अधिकृत IBPS RRB अधिसूचना PDF डाउनलोड करा. ऑफिसर स्केल (I, II आणि III) साठी जाहीर केलेल्या रिक्त पदांची संख्या लिपिक पदापेक्षा कमी आहे. जनरल बँकिंग ऑफिसर, आयटी, चार्टर्ड अकाउंटंट, कायदा, ट्रेझरी, मार्केटिंग आणि कृषी अशा विविध पदांसाठी एकूण ३,९०७ रिक्त पदे जाहीर करण्यात आली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.