Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: परदेशात शिक्षण, UPSC साठी भारतात परतल्या, दुसऱ्याच प्रयत्नात ९५ रँक; IAS सृष्टी मिश्रा यांचा प्रेणादायी प्रवास

Success Story Of IAS Shrishti Mishra: आयएएस सृष्टी मिश्रा यांनी खूप कमी वयात यूपीएससी परीक्षा पास केली आहे. दुसऱ्याच प्रयत्नात त्यांनी ९५ रँक प्राप्त केली आहे.

Siddhi Hande

प्रत्येकाचे काही न काही स्वप्न असते. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजण खूप मेहनत करतात. इच्छाशक्ती आणि सतत मेहनत केल्यावर तुम्ही आयुष्यात नक्कीच तुमचे ध्येय गाठू शकतात. असंच काहीसं सृष्टी मिश्रा यांच्यासोबत झालं. त्यांनी दुसऱ्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक करुन यश मिळवले आहे. त्या सध्या आयएएस म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी यूपीएससी परीक्षेत ९५ रँक प्राप्त केली.

शिक्षण

सृष्टी मिश्रा यांनी आपले ध्येय गाठण्यासाठी खूप मेहनत केली. त्यांनी परदेशात राहून आपले शिक्षण पूर्ण केले. त्या २०१८ मध्ये पुन्हा भारतात परतल्या. त्यांना प्रशासकीय सेवेत काम करायचे होते. त्यांनी यूपीएससी (UPSC) परीक्षेची तयारी केली. त्यांना पहिल्या प्रयत्नात अपयशाचा सामना करावा लागला. परंतु तरीही त्या खचल्या नाही त्यांनी पुन्हा प्रयत्न केले. त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत ९५ रँक प्राप्त केली.

सृष्टी यांचे वडील आदर्श कुमार मिश्रा हे भारतीय विदेश सेवेत अधिकारी होते. ते ब्राझीलमध्ये कार्यरत होते. सृष्टी मिश्रा या मूळच्या उत्तरप्रदेशमधील जौनपूरच्या आहेत. परंतु त्यांनी फरीदाबाद येथे आपल्या मावशीकडे राहून ग्रॅज्युएशन पूर्ण केले.

वडिलांचे स्वप्न पूर्ण केले

सृष्टीला आयएएस किंवा आयपीएस बनायचे होते. देशसेवा करायची होती. सृष्टी मिश्रा यांनी वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत केली. त्यांनी रोज आठ ते दहा तास अभ्यास केला. आईवडिलांपासून दूर भारतात राहून त्यांनी खूप अभ्यास केला. पहिल्या प्रयत्नात त्यांनी प्रिलियम्सदेखील क्लिअर नव्हती केली. परंतु तरीही त्या खचल्या नाही. दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी यश हे मिळवलेच.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: ठाकरे काय करायचं बोल? राज ठाकरेंना टॅग करत उद्योजक सुशील केडियाची धमकी| VIDEO

Eknath shinde: समोर अमित शाह, एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरातची' घोषणा|VIDEO

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

SCROLL FOR NEXT