Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: सावकाराने आईचे २२० रुपये बुडवले, मित्रांनी खिल्ली उडवली, मोठ्या जिद्दीने क्रॅक केली UPSC; IAS हेमंत पारीक यांचा प्रवास

Success Story Of IAS Hemant Pareek: हेमंत पारीक यांनी परिस्थितीशी दोन हात करुन यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांचे बालपण खूप गरीब परिस्थितीत गेले होते. अनेकांनी त्यांची खल्ली उडवली होती. परंतु त्यांनी मोठ्या जिद्दीने परीक्षा क्रॅक केली.

Siddhi Hande

आयुष्यात प्रत्येक वेळी आपल्या मनासारख्या गोष्टी घडतील, असं शक्य नाही. परंतु परिस्थिती कशीही असली तरीही त्यावर मात करण्याची ताकद ही प्रत्येकात असते. अनेकदा आपल्याला परिस्थितीमुळे हिणवले जाते. परंतु हीच परिस्थिती तुम्ही बदलू शकतात. अशीच परिस्थिती राजस्थानच्या हेमंत पारीक यांनी बदलली आहे. त्यांनी आपल्या आईसाठी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. ते सध्या आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. (Success Story)

हेमंत पारीक हे मूळचे राजस्थानचे. त्यांचे वडील पूजारी होती. यातून त्यांना फार कमी पैसे मिळायचे. त्यांनी आई मनरेगाअंतर्गत मजुरी करायची. त्यातून त्या घर सांभाळायच्या. त्यांचे वडिलांची आणि बहिण नेहमी आजारी असायचे. त्यामुळे घराची संपूर्ण जबाबदारी ही आईच्या खांद्यावर होती. हेमंत यांचा स्वतः चादेखील एक हात काम करायचा नाही. (Success Story Of IAS Hemant Parikh)

हेमंत हे काही दिवसांनी हरियाणा येथे गेले. तिथेही त्यांची आई मजुरी करायची. त्यांचे बालपण अत्यंत गरीब परिस्थितीत गेले. परंतु याच परिस्थितीने त्यांना ताकद दिली. एकदा एका सावकाराने हेमंत यांच्या आईला कामाचे २२० रुपये दिले नव्हते. तेव्हा हेमंत यांनी हे पैसे मागितले. तेव्हा सावकाराने त्यांची खिल्ली उडवली आणि 'तू काय कलेक्टर आहेस?, असं म्हणाले.

या एका वाक्यानंतर हेमंत यांनी सिविल सर्व्हिसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. कॉलेजमध्येही सिनियर्स त्यांची खिल्ली उडवायचे. मात्र, याचवेळी त्यांनी आयएएस अधिकारी बनून स्वतः ला सिद्ध करण्याचे ठरवले.हेमंत यांना दहावीपर्यंत बिल्कुल इंग्रजी येत नव्हते. तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी अॅग्रीकल्चरमध्ये ग्रॅज्युएशन केले.

हेमंत यांना स्कॉलरशिप मिळण्याची आशा होती. मात्र तीदेखील बंद झाली. यामुळे त्यांना पैसे मिळत नव्हते. अनेकदा तर त्यांनी काहीही न खाता पिता दिवस काढलेत.कॉलेज झाल्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली. अनेकदा त्यांनी हा निर्धार सोडण्याचाही निर्धार केला होता. परंतु त्यांच्या मित्रांनी त्यांची साथ दिली. त्यांनी २०२३ मध्ये ८८४ रँक मिळवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT