Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: IIT मधून बीटेक, जर्मनीतील नोकरी सोडली, एकदा नाही तर दोनदा UPSC क्रॅक; IAS गरिमा अग्रवाल यांचा प्रवास

Success Story of IAS Garima Agarwal: आयएएस गरिमा अग्रवाल यांनी एकदा नाही तर दोनदा यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांनी जर्मनीतील नोकरी सोडून पुन्हा भारतात येऊन यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

Siddhi Hande

स्पर्धा परीक्षा देऊन आयएएस ऑफिसर होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. आपण कितीही मोठे झालो, स्वप्न सोडून दुसऱ्या कोणत्यातरी क्षेत्रात करिअर असू तरीही कुठेतरी मनात स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा ही असतेच. असंच काहीसं गरिमा अग्रवाल यांच्यासोबत झालं. आयएएस होण्यासाठी त्यांनी जर्मनीतील लाखो रुपये पगाराची नोकरी सोडून दिली. त्या पुन्हा भारतात येऊन यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यांनी एकदा नाही तर दोनदा यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.

आयएएस गरिमा अग्रवाल (IAS Garima Agarwal) यांनी खूप कमी वयात मोठं यश मिळवलं आहे. गरिमा यांना लहानपणापासूनच आयएएस व्हायचे होते. त्यांनी देशातील सर्वात अवघड परीक्षा क्रॅक केली.त्यांचा हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी होता.

गरिमा अग्रवाल या मूळच्या मध्य प्रदेशच्या खरगोन जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांचा फॅमिली बिझनेस आहे. गरिमा यांनी सरस्वती विद्या मंदिरमधून शिक्षण पूर्ण केला. त्यांनी दहावीत ८९ टक्के गुण मिळवले. १२वीत ९२ टक्के गुण प्राप्त केले. १२वीनंतर गरिमा यांनी जेईई परीक्षेची तयारी सुरु केली होती.त्यांनी पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा पास केली होती.

यानंतर गरिमा यांनी आयआयटी हैदराबादमध्ये अॅडमिशन घेतले. त्यांनी बीटेक इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांना जर्मनीत इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. परंतु त्यांना ही नोकरी करायची नव्हती. परंतु देशावर असलेल्या प्रेमामुळे त्या परत आल्या. त्यांनी परत येऊन यूपीएससी परीक्षा दिली.

पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी क्रॅक

गरिमा यांची मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी (UPSC) परीक्षेत २४० रँक प्राप्त केली. त्यांनी आयपीएसचे ट्रेनिंगदेखील घेतले. परंतु त्या समाधानी नव्हत्या. त्यांना आयएएस व्हायचे होते. आयपीएस ट्रेनिंगसोबतच त्यांनी पुन्हा यूपीएससी परीक्षा देण्यावर फोकस केला.

गरिमा यांनी आयपीएस ट्रेनिंग सुरु असताना पुन्हा यूपीएससी परीक्षा दिली. या परीक्षेत त्यांना ४० रँक प्राप्त झाली. त्यांची ही जिद्द सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fake Notes : नकली नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तीन जाणांविरोधात गुन्हा दाखल

Train Ticket Conformation Tips : दिवाळीला गावी जायचंय, पण तिकीट कन्फर्म नाही, 'या' टिप्स करा फॉलो

निवडणूक आयोगाला 2 लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा जोरदार दणका, काय आहे प्रकरण? VIDEO

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना फटका

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

SCROLL FOR NEXT