Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले, लेकीने जिद्दीने एकदा नव्हे तर दोनदा क्रॅक केली UPSC; IAS दिव्या तंवर यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story Of IAS Divya Tanwar: दिव्या तंवर यांनी एकदा नव्हे तर दोनदा यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांनी वयाच्या २१ वर्षीच यूपीएससी परीक्षा पास केली आहे.

Siddhi Hande

प्रत्येक व्यक्तीचे काही न काही स्वप्न असते. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करतात. असंच स्वप्न दिव्या तंवर यांनीदेखील पाहिले होते. दिव्या यांचे बालपण खूप खडतर परिस्थितीत गेले. त्या लहान असतानाच त्यांच्या डोक्यावरुन वडिलांचे छत्र हरपले. या काळात त्यांना खूप वाईट काळाचा सामना करावा लागला. (IAS Divya Tanwar Success Story)

दिव्या तंवर यांनी २०२१ मध्ये यूपीएससी परीक्षा दिली होती. त्यांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले. त्यांनी ४३८ रँक मिळवली. २१ व्या वर्षी देशातील सर्वात अवघड यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.

दिव्या तंवर यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. परंतु दिव्या यांना आयएएस अधिकारी व्हायचे होते. त्यांनी पुन्हा २०२२ मध्ये यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात १०५ वी रँक मिळवली. त्यानंतर त्या आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत झाल्या. (IAS Success Story)

दिव्या या मूळच्या हरियाणाच्या महेंद्रगढच्या रहिवासी. त्यांनी सुरुवातीला शालेय शिक्षण सरकारी शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी विज्ञान शाखेतून पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली. दिव्याच्या आईने त्यांना या काळात खूप सपोर्ट केला. त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय परीक्षा क्रॅक केली. दिव्या या सोशल मीडियावरदेखील खूप प्रसिद्ध आहेत.

दिव्या यांच्या वडिलांचे २०११ साली निधन झाले. त्यानंतर त्यांच्या आईने त्यांचा आणि त्यांच्या भावंडांचा सांभाळ केला. त्यांची आर्थिक परिस्थितीदेखील फार चांगली नव्हती. परंतु आर्थिक परिस्थितीचा सामना करत त्यांनी परीक्षेचा अभ्यास केला. त्यांनी एकदा नव्हे तर तब्बल दोनदा यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?

Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

SCROLL FOR NEXT