HPCL’s HP Navya LPG cylinder now available for instant delivery via Instamart platform saam tv
बिझनेस

गॅस कनेक्शन नसताना ही मिळणार LPG सिलिंडर; 10 मिनिटांत होम डिलिव्हरी, अशी करा बुकिंग

Instamart Hpcl Lpg Cylinder 10 Minute Delivery India: इंस्टामार्ट आणि एचपीसीएलच्या भागीदारीत आता गॅस कनेक्शनशिवाय LPG सिलिंडर मिळणार आहे. ‘HP Navya’ सिलिंडर 10 मिनिटांत घरपोच मिळणार असून बुकिंग प्रक्रिया जाणून घ्या.

Omkar Sonawane

इंस्टामार्ट या भारतातील क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मने मंगळवारी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) सोबत भागीदारी जाहीर करत देशातील पहिली ऑन-डिमांड LPG सिलिंडर डिलिव्हरी सेवा सुरू करण्याची घोषणा केली. या सहकार्याद्वारे HPCL चा नव्याने लॉन्च करण्यात आलेला ‘HP Navya’ हा पुढील पिढीचा 10 किलो कॉम्पोझिट LPG सिलिंडरही बाजारात प्रथमच उपलब्ध होणार आहे. ही सेवा सुरुवातीला बेंगळुरूमध्ये सुरू होणार असून ग्राहकांना इंस्टामार्ट अ‍ॅपवरून थेट ‘HP Navya’ सिलिंडर ऑर्डर करता येणार आहे. तसेच 5 किलोचा मेटल LPG सिलिंडरही उपलब्ध असेल.

कंपन्यांच्या माहितीनुसार, ही सेवा वापरण्यासाठी कोणतेही विद्यमान घरगुती LPG कनेक्शन आवश्यक नसणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, व्यावसायिक तसेच लहान कुटुंबांना याचा मोठा फायदा होणार आहे. पहिल्या ऑर्डरमध्ये नवीन सिलिंडर खरेदी म्हणून डिलिव्हरी दिली जाईल. त्यासाठी ओळख पडताळणी आणि डिलिव्हरीचा पुरावा आवश्यक असेल. पुढील ऑर्डरमध्ये रिकामा सिलिंडर देऊन रिफिल सेवा मिळेल.

HPCL च्या ‘HP Navya’ सिलिंडरला पारंपरिक स्टील सिलिंडरच्या तुलनेत हलका आणि गंजरोधक पर्याय म्हणून सादर करण्यात आले आहे. यामध्ये पारदर्शक बॉडी असल्यामुळे ग्राहकांना गॅसचे प्रमाण सहज पाहता येते. हा सिलिंडर विशेषतः फ्लॅट्स, लहान कुटुंबे आणि अतिरिक्त सिलिंडरची गरज असलेल्या घरांसाठी उपयुक्त आहे. इंस्टामार्टवर दिलेल्या ऑर्डर्स HPCL च्या अधिकृत वितरकांच्या नेटवर्कद्वारे पूर्ण केल्या जातील. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून सर्व सुरक्षा आणि नियमांचे पालन करत डिलिव्हरी केली जाईल.

इंस्टामार्टचे CEO अमितेश झा यांनी सांगितले की, कंपनीने किराणा सेवांपलीकडे विस्तार करत आता दैनंदिन जीवनातील महत्त्वाच्या सेवांमध्ये प्रवेश केला आहे. HPCL सोबतची ही भागीदारी ग्राहकांना सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. HPCL चे मार्केटिंग संचालक अमित गर्ग यांनी सांगितले की, नव्या भारतासाठी LPG अधिक सुलभ करण्यावर आमचा भर आहे. इंस्टामार्टसोबतच्या या सहकार्यामुळे डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचता येईल. सध्या इंस्टामार्ट देशातील 131 हून अधिक शहरांमध्ये 50,000 पेक्षा जास्त वस्तूंची डिलिव्हरी करते. LPG सेवेमुळे कंपनी उच्च-विश्वासाच्या (high-trust) सेवांमध्ये प्रवेश करत आहे. दरम्यान बेंगळुरूनंतर ही सेवा इतर शहरांमध्ये कधी सुरू होणार याबाबत कंपन्यांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

कसे ऑर्डर करणार सिलिंडर?

ग्राहक इन्स्टामार्टवर लॉग इन करून आपल्या पसंतीचा 10 किलो कंपोझिट एलपीजी सिलिंडर किंवा 5 किलो मेटल एलपीजी सिलिंडर निवडू शकतात, तो कार्टमध्ये जोडून ऑर्डर देऊ शकतात. प्रथमच खरेदी करणाऱ्या ग्राहकांना नवीन सिलिंडर दिला जाईल. त्यानंतर, रिफिलसाठी ग्राहकांना वितरणाच्या वेळी रिकामा HPCL सिलिंडर परत करून नवीन रिफिल मिळवता येईल. सर्व ऑर्डर एचपीसीएलच्या अधिकृत वितरक नेटवर्कमार्फत पूर्ण केल्या जातील आणि प्रशिक्षित वितरक कर्मचाऱ्यांकडून लागू असलेल्या सर्व सुरक्षा व नियामक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून वितरण केले जाईल. प्रथमच ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांसाठी ओळख पडताळणी आवश्यक असेल. तसेच संपूर्ण प्रक्रियेत सुरक्षित आणि नियमांनुसार सेवा सुनिश्चित करण्यासाठी प्रूफ-ऑफ-डिलिव्हरी दस्तऐवजीकरणाचाही समावेश करण्यात आला आहे.

सध्या ग्राहकांना 50,000 हून अधिक एसकेयू (SKUs) वितरित करणाऱ्या इन्स्टामार्टसाठी हा उपक्रम उच्च-विश्वासाच्या उत्पादन श्रेणींमध्ये प्रवेश करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे, ज्यामुळे ग्राहकांच्या दैनंदिन जीवनातील त्याची भूमिका अधिक बळकट होईल. तर एचपीसीएलसाठी, अनेक दशकांच्या वितरण कौशल्याचा विस्तार करून सोयीसुविधांवर आधारित, तंत्रज्ञान-सक्षम नव्या वितरण माध्यमात प्रवेश करण्याची ही महत्त्वपूर्ण संधी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील पासपोर्ट कार्यालय उडवून देण्याची धमकी

पावसाळ्यात मिळणाऱ्या रानभेंडीची भाजी कशी बनवायची?

Health News: गॅस, शिंका, जांभई किंवा लघवी थांबवताय? या सवयींमुळे वाढू शकतात गंभीर समस्या

शासकीय कामासाठी मागितली २५ हजाराची लाच; गटविकास अधिकाऱ्याला ठोकल्या बेड्या

Buttermilk Benefits: वजन कमी करण्यासाठी जेवल्यानंतर ताक पिण्याचा डॉक्टर का सल्ला देतात? जाणून घ्या फायदे

SCROLL FOR NEXT