Zudio Success Story Saam Tv
बिझनेस

Zudio Success Story: रतन टाटांच्या सावत्र भावाने सांगितलं Zudio च्या यशाचं सीक्रेट

Zudio Success Story In Indian Market: सध्या मार्केटमध्ये शॉपिंग करताना प्रत्येकजण झुडिओला सर्वप्रथम प्राधान्य देतात. झुडिओच्या यशामागचं कारण तुम्हाला माहितीये का?

Siddhi Hande

सध्या देशभरात वेगवेगळे फॅशन ट्रेंड फॉलो केले जातात. प्रत्येक दिवशी लोकांची स्टाईल, कपडे, अॅक्सेसरीज घालण्याची स्टाईल बदलते. रोज काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न लोक करतात. हेच फॅशन ट्रेंड लोकापर्यंत पोहचवण्यासाठी काही कंपन्या बाजारात उतरल्या आहेत. भारतीय बाजारपेठेत सध्या फॅशनमध्ये टाटा कंपनीच्या झुडिओचा सर्वात मोठा वाटा आहे. (Zudio Success Story)

झुडिओ हा सर्वात लोकप्रिय फॅशन ब्रँड आहे. परवडणारे आणि उत्तम क्वालिटीचे कपडे झुडिओच्या माध्यमातून लोकांना सहज उपलब्ध होतात. सध्या भारतीयांच्या घरात झुडिओचे कपडे किंवा अॅक्सेसरीज जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. झुडिओने सर्वसामान्य लोकांना आपले मार्केट समजले आहे. (Ratan Tata Zudio Success Secret)

झुडिओची मार्केटिंगची पद्धत ही खूप वेगळी आहे. त्यांनी टियर २ आणि टियर ३ शहरांमध्ये कंपनीचा विस्तार केला आहे. झुडिओने भारतीयांच्या गरजा आणि फॅशन स्टाईलला ओळखून त्याचप्रकारे कपडे तयार करु लागली. झुडिओची कामाची पद्धत ही खूप वेगळी आहे. स्वस्त आणि मस्त कपडे आहेत. (How Does Zudio Work)

रतन टाटा यांचे भाऊ नोएल टाटा यांनीदेखील झुडिओचा विस्तार करताना महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले, कंपनी उभारण्यासाठी आमच्याकडे कौशल्य नव्हते. त्यावर आम्ही बराच वेळ काम केले. आम्ही त्यासाठी प्रशिक्षण घेतलं आहे. आमच्याकडे पायाभूत सुविधा होता.याचसोबत कंपनीच्या विस्तारासाठी अनुभव आहे.झुडिओचे सर्व यश हे कार्यक्षम पुरवठा साखळीमध्ये आहे. यात पुरवठा करणारे आणि वितरण करणाऱ्या लोकांच्या नेटवर्कचा समावेश आहे. झुडिओमधील कपड्यांच्या किंमती तुलनेने कमी आहेत. त्यामुळे ग्राहकांची गर्दी वाढते. सध्या झुडिओचे १६१ शहरांमध्ये ५४५ स्टोअर्स आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही; शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर

WhatsApp Blue Tick : व्हॉट्सॲपवर ब्लू टिक मिळवणं झालं सोपं, जाणून घ्या भन्नाट माहिती

Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हा गुडन्यूज देणार? का सुरू आहे अशी चर्चा

Jai Gujarat Row: शिंदेंच्या पक्षाची स्थापना सूरतमध्ये झाली; जय गुजरात’वरून संजय राऊतांचा घणाघात | VIDEO

Maharashtra Live News Update: चामर लेणी येथे झालेल्या ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

SCROLL FOR NEXT