Anil Ambani: मोठी बातमी! अनिल अंबानींना मोठा झटका! २५ कोटींचा दंड अन् ५ वर्षांसाठी सेबीने घातली बंदी

Sebi Ban Anil Ambani And Fined 15 Crore: देशातील प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानींना सेबीने मोठा झटका दिला आबे. सेबीकडून अनिल अंबींनीना ५ वर्षांसाठी बंदी अन् २५ कोटींचा दंड ठोठावला आहे.
Anil Ambani
Anil AmbaniSaam Tv
Published On

देशातील प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांना धक्का दिला आहे. बाजार नियामक सेबीने अनिल अंबानींवर ५ वर्षांची बंद घातली आहे. अनिल अंबानींसाठी हा मोठा धक्का असल्याचे सांगण्यात येत आहे. अनिल अंबानींसह आणखी २४ कंपन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. सेबीने या सर्व कंपन्यांना मार्केटमध्ये व्यव्हार करण्यास बंदी घातली आहे.

Anil Ambani
SBI Scheme: फक्त ७३० दिवस गुंतवणूक करा अन् मिळवा भरघोस व्याज; SBI ची सर्वोत्तम टर्म डिपॉझिट योजना काय आहे?

अनिल अंबानींसह इतर २४ कर्मचाऱ्यांना २५ कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आली आहे. सेबीने घातलेल्या या बंदीनंतर अनिल अंबानी यापुढे सिक्युरिटी मार्केटमध्ये व्यव्हार करु शकणार नाहीत.बाजार नियामक सेबीने अनिल अंबानींच्या रिलायन्स होम फायनान्सला ६ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यांच्या कंपनीवर ६ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे.

अनिल अंबांनीच्या कंपनीवर बंदी का घातली?

कंपनीमधून फंडचे डायव्हर्जन झाल्याचा आरोपावरुन सेबीने मोठी कारवाई केली आहे. सेबीने अनिल अंबानी यांना २५ कोटींचा दंड ठोठावला आहे. त्यांना ५ वर्षांच्या कालावधीसाठी कोणत्याही कंपनीमध्ये संचालक किंवा प्रमुख व्यवस्थापकीय कर्मचारी म्हणून काम करण्यास बंदी घातली आहे.

Anil Ambani
RBI चा 'या' मोठ्या बँकेला जोर का झटका; तब्बल १.२७ कोटींचा दंड ठोठावला

शेअर मार्केटवर परिणाम

सेबीची अनिल अंबानींवर कारवाई होताच रिलायन्स पॉवरमध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आले. त्यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवली आहे.

काय आहे प्रकरण

सेबीने त्यांच्या आदेशात म्हटले आहे की, अनिल अंबानी यांनी RHFL च्या प्रमुख व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने फंड डायव्हर्जन केले आहे. त्यांनी हे फंड त्यांच्या कंपनीशी जोडलेल्या संस्थाना कर्ज म्हणून दिले होते. RHFL च्या संचालक मंडळाने अशा पद्धतीने कोणतेही कर्ज देऊ नये अशा सूचना दिल्या होत्या. परंतु कंपनी व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच अनिल अंबानींवर सेबीकडून बंदी घालण्यात आली आहे.

Anil Ambani
Car Loan Interest: नवीन कार घ्यायचा विचार करताय? या बँका देतायत सर्वात कमी व्याजदरात लोन; वाचा संपूर्ण लिस्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com