Tina Ambani ED Enquiry: अनिल अंबानी यांच्यानंतर पत्नी टीना यांची ईडीकडून चौकशी, FEMA प्रकरणात गुन्हा दाखल

Anil Ambani Wife Tina Ambani: सोमवारीच अनिल अंबानी यांचा ईडीने जबाब नोंदवण्यात होता.
Anil Ambani Wife Tina Ambani
Anil Ambani Wife Tina AmbaniSaam Tv
Published On

Enforcement Directorate: देशातील प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्या पत्नी टीना अंबानी (Tina Ambani) या आज मुंबईतील अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीच्या कार्यालयात हजर झाल्या. परकीय चलन व्यवस्थापन कायदा म्हणजेच फेमा (FEMA) प्रकरणात त्यांची देखील ईडीने चौकशी केली. सोमवारीच अनिल अंबानी यांचा ईडीने जबाब नोंदवण्यात होता. त्यानंतर आज टीना अंबानी यांचा जबाब नोंदवला गेला.

Anil Ambani Wife Tina Ambani
Mumbai Burning Car News: अंधेरीत बर्निंग कारचा थरार! ओला कॅबने अचानक घेतला पेट; प्रवासी-ड्रायव्हर थोडक्यात बचावले

रिलायन्स एडीए समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी हे परकीय चलन कायद्याच्या कथित उल्लंघनाच्या चौकशीसंदर्भात सोमवारी ईडीसमोर हजर झाले होते. 64 वर्षीय अनिल अंबानी हे बॅलार्ड इस्टेट भागातील फेडरल एजन्सीच्या कार्यालयात फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अ‍ॅक्ट अर्थात फेमाच्या विविध कलमांतर्गत नोंदवलेल्या खटल्यात त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी ईडी समोर हजर झाले होते, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Anil Ambani Wife Tina Ambani
Nashik Political News : नाशिकमध्ये अजित पवार, भुजबळ आणि शरद पवार समर्थक आमने-सामने; पोलासांचा मोठा बंदोबस्त

2020 च्या येस बँकेच्या कर्ज प्रकरणात बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात अनिल अंबानी यापूर्वी 2020 मध्ये ईडीसमोर हजर झाले होते. आता पुन्हा ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यानुसार सोमवारी ते ईडी कार्यालयात हजर झाले होते. मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुंबई हाय कोर्टाने 420 कोटी रुपयांच्या करचोरी प्रकरणात अनिल अंबानींना दिलासा दिला होता. तसेच कोर्टाकडून आयकर विभागाला अनिल अंबानींवर कोणतीही जबरदस्ती कारवाई करू नये असे सांगण्यात आले होते.

Anil Ambani Wife Tina Ambani
Dhule Accident CCTV Video: धुळे कंटेनर अपघातामध्ये 13 जणांचा मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO आला समोर

अनिल अंबानी यांच्यावर आरोप आहे की, 2007 च्या सुमारास त्यांच्या कंपन्यांनी एफडीआयच्या माध्यमातून भरपूर पैसा आणला होता. अंबानी आणि त्यांच्या सहयोगी कंपन्यांनी परदेशात कर्जाच्या माध्यमातून पैसा उभा केला आणि एफडीआयच्या माध्यमातून भारतात आणल्याचा आरोप आहे. 2015 मध्ये हा पैसा परदेशात पाठवून कर्ज फेडल्याचे दाखविण्यात आले. ही रक्कम दोन हजार कोटींची असू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. हा पैसा कर्जाच्या स्वरूपात किंवा एफडीआयच्या रूपाने भारतात आला आहे का? याचा तपास ईडी करत आहे. यासोबतच अनिल अंबानींकडे परदेशात पैसा आहे का? याचाही तपास ईडी करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com