EPFO Balance Check  Saam Tv
बिझनेस

EPFO Balance Check : Umang App वरुन मिनिटांत तपासा पीएफ खात्यातील रक्कम, कशी असेल प्रोसेस? जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप

How To Check PF Balance In Umang App : पीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेवर सरकारकडून व्याज दिले जाते. जर तुम्हाला ही रक्कम तपासायची असेल तर तुम्ही ऑनलाइन देखील तपासू शकतात.

कोमल दामुद्रे

How To Check PF Amount : कंपनी दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या पगारातून काही रक्कम वजा करते. ती रक्कम ही कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात जमा केली जाते. यामध्ये जितकी रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारातून कट केली जाते तितकीच रक्कम कंपनी सुद्धा त्यात जमा करते.

पीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेवर सरकारकडून व्याज दिले जाते. अशातच नुकतेच सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ( EPF ) च्या व्याजदरात वाढ केली आहे.

परंतु, कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी पीएफ (PF) खात्यातील रक्कम तपासायला हवी. कर्मचारी अनेक प्रकारे ही रक्कम तपासू शकते. जर तुम्हाला ही रक्कम तपासायची असेल तर तुम्ही ऑनलाइन देखील तपासू शकतात. याशिवाय जर ऑफलाइन (Offline) पद्धतीने एसएमएसद्वारेही शिल्लक तपासता येते.

1. ऑनलाइन शिल्लक कशी तपासायची?

  • कर्मचारी EPFO ​​च्या अधिकृत वेबसाइटद्वारे म्हणजे अधिकृत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) द्वारे देखील शिल्लक तपासू शकतो.

  • याशिवाय उमंग अॅपद्वारेही तो शिल्लक तपासू शकतो.

  • शिल्लक तपासण्यासाठी कर्मचाऱ्याकडे युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAAN) असणे आवश्यक आहे.

  • यासोबतच नोंदणीकृत मोबाईल क्रमांक असणेही आवश्यक आहे.

2. शिल्लक कसे तपासायचे?

  • प्रथम गुगल प्ले स्टोअरवरून उमंग अॅप डाउनलोड करा.

  • यानंतर तुम्हाला उमंग अॅपवर लॉग इन करावे लागेल.

  • तुम्ही मोबाईल नंबर, माझी ओळख, डिजीलॉकर वापरून लॉगिन करू शकता.

  • नोंदणीनंतर उमंग अॅपच्या सर्चवर 'सर्व्हिसेस' लिहून सर्च करावे लागेल.

  • आता तुमच्याकडे ईपीएफओचा सर्व्हिस शो असेल. आता सर्व्हिस पर्याय निवडा.

  • येथे तुम्हाला तुमचा पीएफ खाते शिल्लक तपासण्यासाठी पासबुकवर क्लिक करावे लागेल.

  • पासबुकवर, तुम्हाला एम्प्लॉयी सेन्ट्रिक सर्व्हिस आणि जनरल सर्व्हिसमधून एम्प्लॉयर सेन्ट्रिक सर्व्हिस निवडावी लागेल.

  • आता तुमचा UAN नंबर टाका.

  • यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल.

  • आता OTP टाका आणि OK वर क्लिक करा.

  • यानंतर तुमचे ईपीएफ खाते उघडले जाईल आणि तुम्ही तुमची पीएफ शिल्लक तपासू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

SCROLL FOR NEXT