FASTag Saam Tv
बिझनेस

३००० रुपयांचा FASTag पास कधीपासून मिळणार? अर्ज कसा करावा? स्टेप बाय स्टेप प्रोसेस घ्या जाणून

FASTag Annual Passs Activation Process: केंद्र सरकारने नवीन फास्टॅग वार्षिक पासची घोषणा केली आहे. आता हा पास कधीपासून मिळणार, यासाठी कुठे अर्ज करावा असे अनेक प्रश्न वाहनधारकांच्या मनात निर्माण झाला आहे.

Siddhi Hande

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी फास्टॅगबाबत मोठी घोषणा केली होती. आता वाहनधारकांना ३००० रुपयांचा वर्षभराचा पास मिळणार आहे. या पासवर तुम्ही वर्षभर किंवा २०० ट्रिपपर्यंत प्रवास करु शकणार आहात. यामुळे तुम्हाला आता फ्रीमध्ये प्रवास करता येणार आहे. हा फास्टॅग पास कधीपासून मिळणार? हा फास्टॅग पास कसा काढायचा याबाबत सर्व माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

फास्टॅग पासचे फायदे (FasTag Annual Pass Benefits)

फास्टॅग पासमुळे आता वाहनधारकांना सतत फास्टॅग रिचार्ज करण्याची गरज नाही. तुम्ही एकदाच पास काढून वर्षभर मोफत प्रवास करु शकणार आहात. म्हणजेच तुम्हाला प्रत्येक टोलसाठी १५ रुपये लागणार आहे. यामुळे वाहनधारकांना फायदा होणार आहे.

वार्षिक फास्टॅग पास कसा मिळणार? (How To Get Annual FASTag Pass)

जर तुम्हाला फास्टॅग पास घ्यायचा असेल तर ही प्रोसेस लवकरच सुरु होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, पास अॅक्टिव्हेशन आणि रिन्युअल प्रोसेस ही डिजिटल असणार आहे. सरकार लवकरच यासाठी खास लिंक लाँच करणार आहे. ही लिंक तुम्हाला राजमार्ग यात्रा मोबाईल अॅप, NHAI आणि MoRTH च्या वेबसाइटवर मिळणार आहे. यामुळे कोणत्याही कागदपत्राशिवाय तुम्ही फास्टॅग पास मिळवू शकतात.

अॅक्टिव्हेट कसा होणार? (When Will FASTag Pass Activate)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, १५ ऑगस्ट २०२५ पासून वार्षिक फास्टॅग पास सुरु होणार आहे. फास्टॅग वार्षिक पास अॅक्टिव्हेट करणे डिजिटल असणार आहे. जर तुमच्याकडे आधीच फास्टॅग असेल तर त्यावरच तुम्ही फास्टॅग पास बनवू शकतात. तुम्हाला काही कागदपत्रांची गरज भासणार नाही. सरकार यासाठी एक स्वतंत्र पोर्टलदेखील सुरु करण्याच्या तयारीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: प्रियकर इम्रानसोबत प्लॅन आखला, नवऱ्याचे तुकडे करत समीरचा मृतदेह स्वयंपाक घरात पुरला; असा उलगडला हत्याकांड

Solapur : पूरग्रस्त दौऱ्याचा रात्रीस खेळ चाले; केंद्रीय पथक आलं, टॉर्चमध्ये काय पाहिलं? VIDEO

Pune Crime : पुण्यातल्या भोंदूबाबानं 14 कोटींना लुबाडलं; इंजिनीअरला आणलं रस्त्यावर, नेमकं काय घडलं? VIDEO

Kalyan : कल्याणमधील नियोजन शून्य कारभार चव्हाट्यावर; शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प, कारण काय?

India Women Cricket Team : अभिमानास्पद क्षण! विश्वविजेत्या लेकींनी घेतली PM मोदींची भेट, पहिली झलक समोर

SCROLL FOR NEXT