Nanu Gupta Vijay Sales Success Story google
बिझनेस

Success Story : शिलाई मशीन आणि पंखे विकणाऱ्या सामान्य मुलाने उभी केली ₹७,००० कोटींची कंपनी, जाणून घ्या नानू गुप्ता यांचा प्रेरणादायी प्रवास...

Nanu Gupta Vijay Sales : नानू गुप्ता यांनी छोट्या दुकानातून सुरुवात करून विजय सेल्सला देशभरात पोहोचवलं. चिकाटी, धाडस आणि ग्राहकांशी विश्वास हेच त्यांच्या यशामागचं खरं भांडवल ठरलं.

Sakshi Sunil Jadhav

व्यवसायाच्या जगात मोठी स्वप्ने पाहणारे बरेच जण असतात. त्यातील सगळेच लोक ती स्वप्ने पूर्ण करतात असे नाही. स्वप्न पूर्ण करण्याचे धैर्य आणि क्षमता काही जणांकडेच असते. अशाच धैर्यवान व्यक्ती म्हणजे नानू गुप्ता आहेत. हरियाणातील एका साध्या शेतकरी कुटुंबात १९४२ मध्ये जन्मलेल्या गुप्ता यांना भविष्यात इलेक्ट्रॉनिक्स रिटेल क्षेत्रातील मोठा व्यावसायिक बनायचं होतं. असं त्यांच्या बालपणात त्यांनी ठरवलं होतं.

१९५४ मध्ये लहान वयात ते मुंबईत आले आणि इथेच त्यांच्या आयुष्याला नवा मार्ग सापडला. फक्त २,००० रुपये घेऊन त्यांनी उषा इंटरनॅशनलमध्ये पंखे आणि शिलाई मशीन विकण्याचे कामे सुरू केले. ग्राहकांची मनं जिंकण्याची कला, मार्केटींग आणि ग्राहकांशी मजबूत नातेसंबंध तयार करण्याचे महत्त्व त्यांनी या सुरुवातीच्या नोकरीतूनच शिकले. पुढे हाच पाया त्यांच्या संपूर्ण व्यावसायिक साम्राज्याचा आधार बनला.

१९६७ मध्ये माटुंग्यातील फक्त ५०-६० चौरस फूट जागेत गुप्ता यांनी विजय सेल्सचे पहिले छोटे दुकान सुरू केले. सुरुवातीला फक्त पंखे आणि शिलाई मशीन विकले जात होते. जसजसे काळे-पांढरे टीव्ही आले. तेव्हा यांनी एक धाडसी पाऊल टाकलं. माहीममध्ये मोठे शोरूम उघडून त्यांनी दुकानातील सर्व टीव्ही चालू ठेवले. ज्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधले गेले. या हुशार कल्पनेमुळे ग्राहकांची गर्दी वाढली आणि विक्री मोठ्या प्रमाणात वाढली.

ग्राहकांना हप्त्यांवर वस्तू खरेदी करण्याची सुविधा देऊन त्यांनी मध्यमवर्गीय कुटुंबांना इलेक्ट्रॉनिक्स परवडणारे केले. एवढंच नाही तर ग्राहकांना अडचण आल्यास ते स्वतः त्यांच्या घरी जाऊन समस्या सोडवत असत. यामुळे विजय सेल्सवर प्रचंड विश्वास आणि निष्ठा निर्माण झाली. आता कंपनीचे उद्दिष्ट २०२५ च्या शेवटापर्यंत २०० स्टोअर्स आणि १०,००० कोटींचे उत्पन्न मिळवण्याचे आहे. एका छोट्या दुकानातून सुरू झालेला हा प्रवास आज इलेक्ट्रॉनिक्स साम्राज्याचा एक भाग आहे. नानू गुप्ता यांची कहाणी हे जिवंत उदाहरण आहे की, यशासाठी मोठ्या भांडवलाची गरज नसते तर चिकाटी, धाडस आणि ग्राहकांशी असलेले घट्ट नाते हेच सर्वात मोठे भांडवल ठरते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SEBI Recruitment: खुशखबर! सेबीमध्ये सरकारी नोकरीची संधी; ग्रेड ए पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

Marathi Actor : आणखी एक मराठी अभिनेता अडकणार लग्नबंधनात, 'या' अभिनेत्रीसोबत थाटणार संसार

Cyclone Alert : मोंथा चक्रीवादळ निवळलं? राज्यात पावसाचा जोर कायम, 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Live News Update: निलेश घायवळच्या आई -वडिलांना पुणे पोलिसांचे पत्र

Shocking: रिलच्या नादात ट्रेनची धडक, फुटबॉलसारखा उडाला; तरूणाचा जागीच मृत्यू, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT