Sakshi Sunil Jadhav
गणेशोत्सवासाठी उकडीचे मोदक दरवर्षी गृहीणी आवर्जून करतात. पुढे आपण मोदत कडक किंवा जास्त पातळ होऊ नये म्हणून कोणती पद्धत फॉलो केली पाहिजे हे जाणून घेणार आहोत.
गुळ निवडताना तो पातळ हाताने सहज तुटेल असा वापरु नये.
गुळ वितळवताना किसलेला गुळ वापरावा. ज्याने तो पटकन वितळतो.
गॅस फास्ट करुन गुळ वितळवल्यावर तो लगेच कडक होऊ शकतो. म्हणून गॅस स्लोच ठेवा.
खोबरं किसल्यावर लगेच ढवळा, जुनं खोबरं सारणाची चव बिघडवू शकतं.
थोडंसं तूप घालून सारण हलकं व सुटसुटीत होतं.
सारण बनवताना किंवा गुळ वितळवण्यासाठी पाण्याचा वापर अजिबात करु नका.