RBI Rules For Bank Account Opening Saam Tv
बिझनेस

RBI Rule: एक व्यक्ती किती बँक खाती उघडू शकते? जाणून घ्या काय आहे नियम...

Bank Account Opening Rule: एक व्यक्ती किती बँक खाती उघडू शकते? जाणून घ्या काय आहे नियम...

Satish Kengar

RBI Rules For Bank Account Opening:

देशात जवळपास प्रत्येक व्यक्तीचे बँक खाते आहे. कोणी बँक खात्यातून बचत करतो, कोणी दैनंदिन खर्चासाठी त्याचा वापर करतो. तर अनेक लोक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी बँक खाती उघडतात. एवढेच नाही तर आता मुलांची बँक खातीही उघडली जातात.

ज्यामध्ये सरकारी शाळा मुलांना दिलेल्या मदतीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करते. अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती किती बँक खाती उघडू शकते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? याबाबत भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयचा काही नियम आहे का? याचबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

बँक खात्यांचे प्रकार:

आधी जाणून घेऊयात किती प्रकारची बँक खाती आहेत...

  • बचत खाते

  • चालू खाते

  • सॅलरी अकाउंट (Latest Marathi News)

यातच लोक कोणते खाते सर्वात जास्त उघडतात किंवा कोणते खाते ते सर्वात जास्त वापरतात याबद्दल बोलल्यास, बचत खाते क्रमांक 1 वर येते. सामान्यतः लोक ते प्रायमरी खाते म्हणून वापरतात.  (Utility News)

लोक आपली कमाई बचत खात्यात जमा करतात आणि नंतर या पैशावर बँकेकडून व्याज दिले जाते. काही बँका दरमहा, काही तीन, काही सहा महिने किंवा वार्षिक व्याज देतात. दुसरीकडे, व्यावसायिक लोक चालू खाती वापरतात आणि पगारदार लोक सॅलरी अकाउंट वापरतात.

एक व्यक्ती किती बँक खाती उघडू शकते?

आरबीआयच्या नियमांनुसार, कोणतीही व्यक्ती भारतात कितीही बँक खाती उघडू शकते. यासाठी कोणत्याही प्रकारची मर्यादा निश्चित केलेली नाही. तुम्ही उघडलेल्या सर्व बँक खात्यांची काळजी घ्यावी लागेल. खाते उघडल्यानंतर जे त्या खात्याकडे लक्ष देत नाहीत, त्यांच्या खात्यावर बँकेकडून शुल्क आकारले जाते. अशा गोष्टी टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या सर्व बँक खात्यांची काळजी घेतली पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT