ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ही एक अशी संस्था आहे, जी देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी काम करते. २० पेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या खासगी कंपन्यांना या योजनेअंतर्गत आपल्या कर्मचाऱ्यांसाठी पीएफ योजना लागू करावी लागते. यातून कंपनी आणि कर्मचारी दोघांचेही योगदान अनिवार्य असते. मात्र अनेक वेळा कर्मचारी आपल्या पे स्लिपमध्ये पाहतात की कंपनीकडून जमा झालेली रक्कम स्वतःच्या योगदानाच्या तुलनेत कमी आहे. मग हा प्रकार नेमका घडतो तरी का?
पीएफमध्ये एकूण जे पैसे जमा होतात, त्यात कर्मचारी आणि कंपनी दोघांचे १२% योगदान असते. जर एखाद्या कर्मचाऱ्याने महिन्याला २००० रुपये जमा केले, तर कंपनीलाही तितकीच रक्कम जमा करावी लागते. म्हणजे दरमहा एकूण ४००० रुपये पीएफमध्ये भरले जातात. यावर वार्षिक व्याजही दिले जाते. परंतु या ४००० पैकी कंपनीच्या २००० रुपयांचे वाटप थेट कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यावर होत नाही.
या २००० रुपयांपैकी केवळ ३.६७ टक्के म्हणजे सुमारे ६११ रुपयेच पीएफ खात्यात जमा होतात. उरलेले ८.३३ टक्के म्हणजेच जवळपास १३८९ रुपये ईपीएस – कर्मचारी पेन्शन योजनेमध्ये वळवले जातात. त्यामुळे कर्मचाऱ्याच्या पे स्लिपमध्ये कंपनीचे योगदान कमी असल्याचे दिसते. प्रत्यक्षात कंपनी १२% योगदान करतेच, परंतु त्याचा एक भाग पेन्शन योजनेसाठी राखून ठेवला जातो.
याशिवाय या योजनेमध्ये EDLI म्हणजेच कर्मचारी ठेवीशी जोडलेला विमा योजनाही समाविष्ट असते, ज्यातून कामगाराच्या आकस्मिक मृत्यूच्या स्थितीत लाभ मिळतो. त्यामुळे कंपनीचे योगदान केवळ PF खात्यावर मर्यादित नसून ते वेगवेगळ्या योजनांमध्ये विभागले गेलेले असते.
म्हणूनच, जर तुम्हाला कधी वाटले की तुमच्या कंपनीने PFमध्ये कमी रक्कम भरली आहे, तर हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की तुमच्या संपूर्ण फायद्यांसाठी ही रक्कम वेगवेगळ्या योजनांमध्ये वाटली जाते. ही पारदर्शक आणि नियमानुसार रचना असून, दीर्घकालीन वित्तीय सुरक्षिततेच्या दृष्टीने उपयुक्त ठरते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.