Honda Livo Saam Tv
बिझनेस

60 KM मायलेज, किंमत 80000 हजारांपेक्षा कमी; जबरदस्त Honda ची न्यू जनरेशन बाईक Livo

Honda Bike Under 80000: Honda Livo ही बेस्ट मायलेज बाईक असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या बाईकची किंमत 80000 हजारांपेक्षा कमी असून यात जबरदस्त फीचर्स ग्राहकांना मिळतात.

Satish Kengar

होंडा आपल्या बाइक्समध्ये आकर्षक रंग पर्याय आणि हाय पिकअप ऑफर करतो. Honda Livo ही कंपनीची न्यू जनरेशन बाईक आहे. या बाईकमध्ये 4 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. ही बाईक 78500 रुपये एक्स-शोरूमच्या प्रारंभिक किंमतीत ऑफर केली जात आहे.

Livo मध्ये 109.51 cc चे पॉवरफुल इंजिन आहे. कंपनीचा दावा आहे की, ही बाईक 60 kmpl जास्त मायलेज देते. बाईकचे वजन 113 किलोग्रॅम आहे. ज्यामुळे ही बाईक चालवणे सोपे होते. बाईकमध्ये 9 लिटरची इंधन टाकी आहे.

Honda Livo ची सीटची उंची 790 mm आहे. बाईक दोन प्रकारात येते. यात ड्रम आणि डिस्क ब्रेक दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. बाईक तीन रंगात येते. यात Combined Braking System देण्यात आली आहे. जी बाईकच्या दोन्ही टायरवर नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

Honda Livo मध्ये एक डिजिटल कन्सोल आहे, जो याला डॅशिंग लूक देतो. आरामदायी प्रवासासाठी यात सिंगल पीस सीट आहे. बाईकमध्ये ट्यूबलेस टायर आणि अलॉय व्हील देण्यात आले आहेत. ही पॉवरफुल बाईक 8.6 bhp पॉवर आणि 9.3 Nm टॉर्क जनरेट करते.

या होंडा बाईकच्या पुढील बाजूस टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस स्प्रिंग-लोडेड हायड्रॉलिक ड्युअल शॉक अॅब्जॉर्बर सस्पेंशन आहे. ही बाईक हिरो पॅशन एक्स प्रो आणि TVS व्हिक्टर यांच्याशी स्पर्धा करते. जे या सेगमेंटमध्ये आधीच बाजारात उपलब्ध आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iPhone 17 Pro: 'या' ५ देशांमध्ये Apple iPhone 17 Pro स्वस्तात मिळणार, ₹37,424 होईल बचत

Ratnagiri Tourism: रत्नागिरीपासून अवघ्या पाऊण तासाच्या अंतरावर वसलंय स्वर्गाहून सुंदर ठिकाण; निळाशार समुद्र, सोनेरी वाळू अन् लपलेलं पर्यटन रत्न

Raj Thackeray: उद्धव ठाकरेंपाठोपाठ राज ठाकरे जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर, कसा असेल दौरा? VIDEO

MNS : प्ले ग्रुपमधील चिमुरड्याला मारहाण प्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

शरीरावर असलेल्या बर्थमार्कमुळे कॅन्सर होऊ शकतो का?

SCROLL FOR NEXT