बाजारात मिड सेगमेंटच्या बाईक्सना जास्त मागणी आहे. या बाईक हाय स्पीड आणि जास्त मायलेज देतात. होंडाची अशीच एक बाईक Honda SP160 आहे. या बाईकमध्ये न्यू जनरेशन अलॉय व्हील आणि डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. या जबरदस्त बाईकमध्ये 162.71 cc इंजिन आहे. बाईकमध्ये साधे हँडलबार आणि LED लाईट्स आहेत.
ही बाईक अवघ्या 16 सेकंदात 100 किमी प्रतितासचा वेग गाठते. यात 12 लीटरची मोठी इंधन टाकी आहे. हे 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते. दुचाकीस्वाराच्या सुरक्षेसाठी बाईकला अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम देण्यात आली आहे.
या बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.17 लाख रुपये आहे. बाईक 13.27 bhp पॉवर आणि 14.58 Nm टॉर्क जनरेट करते . या होंडा बाईकचे वजन 139 किलो आहे. ही एक हाय स्पीड बाईक आहे, कंपनीचा दावा आहे की, ही बाईक 50 kmpl पर्यंत मायलेज देते.
Honda SP160 दोन प्रकारात येते. याची सीटची उंची 796 mm आहे, ज्यामुळे कमी उंची असलेले लोकही ही बाईक सहज चालवू शकतात. याच्या इंधन टाकीवर ग्राफिक्स पाहायला मिळतात. याची लांबी 2061 मिमी आहे. आरामदायी राईडसाठी, बाईकला पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क आणि मागच्या बाजूला मोनोशॉक सस्पेन्शन देण्यात आले आहे. बाईकची रुंदी 1113 मिमी आहे.
होंडाच्या या बाईकचा टॉप स्पीड 108 किमी प्रतितास आहे. ही बाईक हाय एंड एक्झॉस्ट आणि डिजिटल कन्सोलसह येते. यात सिंगल पीस सीट, ओडोमीटर आणि ट्रिप मीटर रीडिंग सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. बाईकमध्ये टर्न इंडिकेटर आणि एलईडी लाईट्स देण्यात आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.