फक्त 8,999 रुपयांमध्ये घरी घेऊन जा 'ही' स्कूटर, देते 56km चा मायलेज; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Hero Destini Prime: जर तुम्ही 125cc स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Hero MotoCorp आपल्या 125cc स्कूटर 'Destini Prime' वर खूप चांगली ऑफर देत आहे.
फक्त 8,999 रुपयांमध्ये घरी घेऊन जा 'ही' स्कूटर, देते 56km चा मायलेज; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Hero Destini PrimeSaam Tv

जर तुम्ही 125cc स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Hero MotoCorp आपल्या 125cc स्कूटर 'Destini Prime' वर खूप चांगली ऑफर देत आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही सहजही स्कूटर खरेदी करू शकता. यावर तुम्हाला कमी डाउन पेमेंटचाही लाभ मिळणार आहे. Destini Prime ची स्पर्धा TVS Jupiter 125 आणि Suzuki Access 125 शी होते.

डिझाइनच्या बाबतीत ही स्कूटर साधी आहे. हिरोने फॅमिली क्लासला लक्षात ठेवून ही स्कूटर डिझाइन केली आहे. रायडरच्या गरजा लक्षात घेऊन या स्कूटरमध्ये अनेक चांगले फीचर्सही देण्यात आले आहेत. यात डिजिटल ॲनालॉग स्पीडोमीटर, मोबाइल चार्जिंग पोर्ट, लांब रुंद सीट आणि बॉडी कलर मिरर सारखे फीचर्स दिले आहेत.

फक्त 8,999 रुपयांमध्ये घरी घेऊन जा 'ही' स्कूटर, देते 56km चा मायलेज; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
पॉवरफुल इंजिन, 70 Kmpl मायलेज; 80000 हजारांच्या आत येतात 'या' बाईक्स

इंजिन आणि पॉवर

Hero Destini Prime मध्ये 124.6 cc एअर-कूल्ड, 4-स्ट्रोक, SI इंजिन आहे. जे 9 BHP पॉवर आणि 10.36 Nm टॉर्क जनरेट करते. ही स्कूटर एक लिटरमध्ये 56 किलोमीटर मायलेज देते, असा कंपनीचा दावा आहे.

किती आहे किंमत?

Hero Destini Prime ची एक्स-शोरूम किंमत 71,499 रुपयांपासून सुरू होते. हिरोने या स्कूटरवर जबरदस्त ऑफर दिली आहे, जेणेकरून ती खरेदी करणे सोपे जाईल. तुम्ही फक्त 8999 रुपये डाउन पेमेंट भरून ही स्कूटर घरी नेऊ शकता आणि उर्वरित पेमेंट EMI मध्ये करू शकता. या ऑफरबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही Hero MotoCorp शोरूमशी संपर्क साधू शकता.

फक्त 8,999 रुपयांमध्ये घरी घेऊन जा 'ही' स्कूटर, देते 56km चा मायलेज; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
TVS ची नवीन मोपेड बाईक आहे जबरदस्त! देते 53 KM मायलेज, किंमत 44, 999 रुपयांपासून सुरू

या स्कूटरशी होणार स्पर्धा

TVS Jupiter 125: ही आपल्या सेगमेंटमधील जबरदस्त दिसणारी स्कूटर आहे. यात सीटखाली 32 लीटरची स्पेस मिळते. जिथे तुम्ही 2 फुल फेस हेल्मेट सहज ठेवू शकता. यात 124.8cc इंजिन आहे, जे 8.3PS पॉवर आणि 10.5Nm टॉर्क जनरेट करते. या स्कूटरची एक्स-शो रूम किंमत 86,405 रुपयांपासून सुरू होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com