Honda Shine 100 DX Launched – Stylish, Budget-Friendly Bike Aimed at Daily Commuters saamtv
बिझनेस

हिरोला टक्कर देणार होंडा! नवीन Shine 100 DX बाईक लॉन्च; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत

Honda Shine 100 DX Launched: होंडा कंपनीने भारतात शाईन १०० डीएक्स लॉन्च केलीय. एंट्री-लेव्हल खरेदीदारांना लक्ष्य करत कंपनीने ही बाईक लॉन्च केलीय. ही बाईक हिरो स्प्लेंडर प्लसशी थेट स्पर्धा करेल.

Bharat Jadhav

  • होंडाने Shine 100 DX नावाची एंट्री-लेव्हल बाईक सादर केली आहे.

  • ही बाईक थेट हिरो स्प्लेंडर प्लसशी स्पर्धा करणार आहे.

  • परवडणारी किंमत आणि आकर्षक डिझाईन ही या बाईकची खास वैशिष्ट्ये आहेत.

  • मार्केट एक्सपर्टनुसार, स्प्लेंडरची विक्री कायम राहील पण नवीन ग्राहकांसाठी शाईन 100 DX पर्याय ठरू शकते.

होंडाने नुकतीच एंट्री लेव्हल बाईक शाईन १००डीएक्स लाँन्च केलीय. कंपनीने या बाईकची किंमत देखील जाहीर केली आहे. ही बाईक थेट हिरो स्प्लेंडर प्लसशी स्पर्धा करणार आहे. नवीन शाईनच्या आगमनाचा स्प्लेंडरच्या विक्रीवर परिणाम होईल का? हे पाहणे बाकी आहे. परंतु असे मानले जाते की नवीन मॉडेलच्या आगमनामुळे स्प्लेंडर प्लसच्या विक्रीवर फारसा फरक पडणार नाहीये काही मार्केट एक्सपर्टचं मत आहे. पण ही बाईक आपल्या किंमतीमुळे नवीन ग्राहकांना आकर्षित करू शकते.

इंजिन कसं आहे?

होंडा शाईन १०० डीएक्स ९८.९८ सीसी सिंगल सिलेंडर, फ्युएल इंजेक्टेड ओबीडी२बी अनुरूप इंजिनने सुसज्ज आहे जे ५.४३ किलोवॅट आणि ८.०४ एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ४ स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. यात पुढील आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक आहेत. विशेष म्हणजे यात एकत्रित ब्रेकिंग सिस्टम (CBS) आहे जे ड्रम ब्रेक असूनही प्रभावीशाली आहे.

नवीन शाईन १००डीएक्समध्ये डिजिटल एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. यात तुम्हाला रिअल टाइम मायलेज आणि डिस्टेंस टू एम्प्टी यासारखे फीचर्स मिळतील. बाईकची डिझाईन चांगली आहे आणि तिची इंधन टाकी थोडी बोल्ड आहे. बाईकची सीट मऊ आणि आरामदायी आहे. दैनंदिन वापरासाठी ही एक चांगला पर्याय ठरू शकते. होंडाची नवीन शाईन १००डीएक्स देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाईक हिरो स्प्लेंडर प्लसशी स्पर्धा करेल,असं म्हटलं जात आहे.

हिरो स्प्लेंडर प्लसची किंमत ७९,००० रुपयांपासून सुरू होते. या बाईकमध्ये ९७.२ सीसी सिंगल-सिलेंडर इंजिन आहे जे ७.९ बीएचपी पॉवर आणि ८.०५ एनएम टॉर्क देते, याशिवाय इंजिन ४ स्पीड गिअरबॉक्ससह येते. बाईकच्या आकर्षक किंमतीमुळे ग्राहक शोरुम बाहेर रांगा लावतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: टेंभी नाका येथील नवरात्रोत्सवात यंदा बृहदेश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा

Madhura Joshi: गुलाबी साडी अन् ओठावर लाली, मधुराच्या सौंदर्याची भलतीच चर्चा

Nandurbar Crime : किरकोळ वादातून भररस्त्यात चाकू हल्ला; तरुणाचा मृत्यू, नंदुरबारमध्ये तणावाचे वातावरण

Shahrukh Khan: शाहरुख खानसाठी मुलगा आर्यन झाला फोटोग्राफर; 'बॅड्स ऑफ बॉलीवूड'च्या स्क्रीनिंगचा VIDEO व्हायरल

High Court: मराठा आरक्षणाच्या GR विरोधात याचिका, न्यायाधीशांनी दिला मोठा निर्णय, कोर्टात नेमकं काय काय झालं?

SCROLL FOR NEXT