Home Loan Tips Saam Tv
बिझनेस

Home Loan: सेकंड होम लोन घेताय? तर 'या' गोष्टी ठेवा ध्यानात, अन्यथा होईल मोठं नुकसान

Home Loan Tips: सेकंड होम लोन घेण्याआधी हा निर्णय आपण का घेत आहोत, त्या कारणांचं मूल्यांकन करा. ही गुंतणवूक का करत आहोत त्याचे उद्दिष्ट स्पष्ट पाहिजे. दुसरं घर हे फक्त भाड्याने देण्यासाठी घ्यायचे आहे का? का आपल्याला स्वत: च्या वापरासाठी घर घ्यायचे आहे. हे उद्दिष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

Bharat Jadhav

Second Home Loan:

प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवणूक करणं हा सर्वात फायदेशीर निर्णय आहे. पण त्या गुंतवणुकीत जर तुम्ही दुसरं गृहकर्ज घेणार असाल तर काही गोष्टी डोक्यात ठेवणं आवश्यक आहे. दोन घरांचं मालक होणं जितकं आकर्षक वाटणारी गोष्ट असेल तरी काही गोष्टी डोक्यात ठेवणं आवश्यक आहे. कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत, ते जाणून घेऊ..(Latest News)

आपल्या गरजा समजून घ्या

सेकंड होम लोन घेण्याआधी हा निर्णय आपण का घेत आहोत, त्या कारणांचं मूल्यांकन करा. ही गुंतणवूक का करत आहोत त्याचे उद्दिष्ट स्पष्ट पाहिजे. म्हणजे तुम्हाला दुसरं घर हे फक्त भाड्याने देण्यासाठी घ्यायचे आहे का? का आपल्याला स्वत: च्या वापरासाठी घर घ्यायचे आहे. हे उद्दिष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

दुसरे गृहकर्ज घेण्यापूर्वी आर्थिक तयारी करा

  • दुसरे गृहकर्ज घेण्यामध्ये महत्त्वपूर्ण आर्थिक परिणाम होतात. अशा परिस्थितीत या पैलूंचा विचार करा आणि आपल्या आर्थिक तयारी काय आहे याचा विचार करा.

  • सध्याच्या गृहकर्जाची थकबाकी आणि परतफेडीची स्थिती तपासून घ्या.

  • दुसरं होम लोन परतफेड करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसे उत्पन्न आहे का याची खात्री करा.

  • डाउन पेमेंटसाठी पैशांची उपलब्धता असेल तर दुसरे गृहकर्ज घेण्याचा विचार करा. अनपेक्षित खर्च कव्हर करण्यासाठी आपत्कालीन बॅलन्स आहे का नसेल तर तो आधी करून ठेवा.

  • क्रेडिट स्कोअर, सध्या चालू असलेले कर्ज आणि उत्पन्न, कर्जाचे प्रमाण या गोष्टी डोक्यात ठेवून दुसरे कर्ज घेण्याची पात्रता तपासा.

होम लोनचा कालावधी आणि व्याजदर चेक करा

दुसरे होम लोन घेतांना ते कर्जाचा अवधी किती दिवसांचा असेल. तसेच कर्जाचे व्याजदर काय असेल. हे सर्व डोक्यात ठेवा. जेव्हा या गोष्टी ज्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. या गोष्टी लक्षात ठेवल्या तर कर्ज कशापद्धतीने फेडायचं याचे नियोजन तुम्हाला करता येईल. तुमचे उत्पन्न पुरेसे असल्यास आणि कार्यकाळ योग्य असल्यास तुम्ही तुमच्या कर्जाची त्वरीत परतफेड करू शकता.

व्याजदर आणि कर्जाचा कालावधी यांच्यात योग्य संतुलन असणे महत्त्वाचं आहे, कारण दुसरे घर शोधताना याचा थेट परिणाम आर्थिक स्थिरता, रोख पैशांचं व्यवस्थापन आणि एकूण आर्थिक स्थिततीवर याचा परिणाम होतो. या घटकांचे योग्य मूल्यमापन केल्याने दुसऱ्या घराच्या मालक होणं सोपं होतं. म्हणूनच दुसऱ्या गृहकर्जाशी संबंधित अटी, कर्जाचा कालावधी आणि व्याजदर समजून घेणे महत्त्वाचे आहे.

कर्ज व्याज दर

विविध कर्ज देणाऱ्या संस्थांची त्यांच्या व्याजदरांची तुलना करा. व्याजदर सुलभ हप्ते भरण्यासाठी योग्य आहेत का याचा विचार करावा.

कर्जाचा कालावधी

तुमच्या परतफेडीचा कालावधी विचारात घ्या. अल्प मुदतीची कर्जे कमी व्याजासह येतात परंतु मासिक हप्ता जास्त असतो. त्यामुळे तुमच्या उत्पन्नाची गोळाबेरीज डोक्यात ठेवा.

टॅक्स नियम

सेकंड होम लोनसाठी टॅक्स बेनिफिट- इंटरेस्ट पेमेंटवरील कपात आणि मालमत्ता कर याची माहिती घ्या.

प्रॉपर्टी सेलेक्शन आणि मार्केट

तुम्ही घर कोणत्या ठिकाणी घेत आहात. तेथे येणारे नवीन प्रोजेक्ट कोणते. याची माहिती घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या नव्या घराच्या किमतीचा अंदाज लावता येईल. दुसऱ्या घरातील गुंतवणुकीच्या यशामध्ये योग्य मालमत्तेची निवड महत्त्वाची भूमिका बजावते.

लोकेशन आणि मार्केट ट्रेंड

त्यातून कमाई होईल का? त्यासाठी त्या मालमत्तेची ग्रोथ पोटेंशिअल, मागणी आणि आवश्यक सुविधा किती अंतरावर आहेत, यासाठी प्रॉपर्टी लोकेशनचं शोध घ्या. तसेच घराची रिसेल मुल्यांकन डोक्यात ठेवा.

जोखमीसाठी तयार रहा

घराची किंमत विचारात घेण्यासह आणीबाणीसारख्या परिस्थिती हाताळण्यासाठी तुम्ही तयार असले पाहिजे. अनपेक्षित परिस्थितींसाठी तयार रहा आणि संभाव्य धोके कमी करा.

प्रॉपर्टी मेंटनेंस

मेंटनेंस कॉस्ट, प्रॉपर्टी कर आणि सेकंड प्रॉपर्टीचा विम्यासाठी बजेट तयार ठेवा.

कायदेशीर आणि नियामक तपासा

मालमत्तेची मालकी, कायदेशीर बाबी योग्य आहेत का ते तपासून घ्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies: काळेभोर आणि दाट केसांसाठी एकदा ट्राय करा 'हे' उपाय

Onion Crop : धुक्यामुळे कांदा पिक धोक्यात; रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी हवालदिल

VBA News : वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध! पाहा नेमकं काय आहे जाहीरनाम्यात | Video

Sneeze: शिंकताना डोळे का बंद होतात? जाणून घ्या एका क्लिकवर

Crime News : ३-३ गर्लफ्रेंड, महागडं गिफ्ट द्यायचं होतं; पठ्ठ्या थेट बँक लुटायला गेला, पण सगळा घोळ झाला!

SCROLL FOR NEXT