Bank Loan Interest Saam Tv
बिझनेस

Loan Interest Rate: होम लोन झालं स्वस्त! या ५ बँकांनी व्याजदरात केली मोठी कपात

Loan Interest Rate Cut after Repo Rate: रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर आता विविध बँकांनी कर्जावरील व्याजदरात कपात केली आहे. यामुळे कर्जदारांना दिलासा मिळाला आहे.

Siddhi Hande

रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये केली कपात

५ बँकांनी कर्जावरील व्याजदर केले कमी

होम लोन, कार लोन झालं स्वस्त

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ५ डिसेंबरच्या पतधोरण बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने रेपो रेट ०.२५ बेसिस पॉइंट्सने कमी केले आहेत. यामुळे सध्या रेपो रेट ५.२५ टक्के आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयानंतर अनेक बँकांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.बँकांनी कर्जावरील व्याजदरात कपात केली आहे. व्याजदरात कपात झाल्याने आता ईएमआयदेखील कमी होणार आहे.

बँक ऑफ बडोदा ते बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांनी होम लोनवरील व्याजदरात कपात केली आहे.

२०२५ मध्ये इतक्या वेळा रेपो रेटमध्ये कपात

२०२५ मध्ये रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये जवळपास १.२५ बेसिस पॉइंट्सने कपात केली आहे. रेपो रेट सध्या ५.२५ आहे. रेपो रेटमध्ये सर्वात पहिली कपात फेब्रुवारी २०२५ मध्ये झाली होती. त्यावेळी रेपो रेट ६.५० वरुन ६.२५ टक्के झाला होता. यानंतर एप्रिलमध्ये पुन्हा २५ बेसिस पॉइंट्सने कपात करण्यात आली होती. यानंतर सलग तिसऱ्यांदा जून महिन्यात ५० टक्के बेसिस पॉइंट्सने कपात केली. यानंतर आता पुन्हा बेसिस पॉइंट्समध्ये कपात झाली आहे.यामुळे यावर्षी सर्वाधित कपात झाल्याने कर्जदारांना मात्र दिलासा मिळाला आहे.

या बँकांनी व्याजदरात केली कपात (These Banks Interest Rate Cut)

बँक ऑफ इंडिया

बँक ऑफ इंडियाने RBLR मध्ये २५ बेसिस पॉइंट्सने कपात केली आहे. यामुळे व्याजदर ८.३५ टक्क्यांवरुन ८.१० टक्के झाले आहे.

इंडियन बँक

इंडियन बँकेने RBLR मध्ये कपात केली आहे. यामुळे व्याज ८.२० टक्क्यांवरुन ७.५९ टक्के झाली आहे.याचसोबत एमसीएलआरमध्येही ५ बेसिस पॉइंट्सने कपात केली आहे.

बँक ऑफ बडोदा

बँक ऑफ बडोडाने बेस्ड लेंडिंग रेट्समध्ये २५ बेसिस पॉइंट्सने कपात केली आहे. यामुळे हे दर ८.१५ वरुन ७.९० झाले आहे.

करुर व्यास बँक

या बँकेनेदेखील एमसीएलआरमध्ये कपात केली आहे. बँकेने एमसीएलआर १० बेसिस पॉइंट्सने कमी केले असून ते ९.४५ झाले आहेत.

बँक ऑफ महाराष्ट्र

बँक ऑफ महाराष्ट्रने रेपो लिंक्ड रेटमध्ये २५ बेसिस पॉइंट्सने कपात केली आहे. यामध्ये होम लोन ७.१० टक्के झाला आहे. तर कार लोन ७.४५ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वैद्यकीय चाचणीत कॅन्सर झाल्याचं समजलं; कंपनीनं कर्मचाऱ्याला थेट कामावरुन काढलं, पुण्यातील संतापजनक प्रकार

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? ठाकरे-पवारांचे आमदार फुटणार? VIDEO

Thursday Horoscope : सोनं, पैशांचं घबाड हाती लागणार; ५ राशींचे लोक डाव साधणार

Maharashtra Live News Update: उदगीरमध्ये उभ्या ट्रकला भीषण आग, ट्रकमधील स्वयंपाकाच्या गॅसचा स्फोट

पुणे शहर पोलीस दलात मेगा भरती, २००० पदांसाठी २ लाखांहून अधिक अर्ज; प्रक्रिया कधी सुरु होणार?

SCROLL FOR NEXT