Home Loan EMI Home Loan
बिझनेस

Home Loan EMI: होम लोन घेणाऱ्यांना मिळणार आनंदाची बातमी; ५ वर्षानंतर कमी होणार EMI

Home Loan EMI: RBI च्या पतधोरणात रेपो दर कपातीची घोषणा केल्यानंतर गृहकर्ज EMI कमी होऊ शकते. आरबीआयचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा चलनविषयक धोरण समितीचा पहिला निर्णय घेणार आहेत.

Bharat Jadhav

होम लोन संदर्भात एक मोठी अपडेट समोर आलीय. तुम्ही होम लोन घेण्याचा विचार करताय, किंवा घेण्याचा विचार करत आहात. तर ही बातमी तुम्हाला आनंद देणारी ठरणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी रेपो रेट निश्चित केलं जाणार आहेत. लोन घेणारे ग्राहक दीर्घकाळापासून त्यांचा ईएमआय कमी होण्याची वाट पाहत आहेत. आता त्यांची प्रतीक्षा उद्या (7 फेब्रुवारी 2025) संपेल.

शुक्रवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीमध्ये (MPC) रेपो दर कपातीची घोषणा केली जाऊ शकते. यासह गृहकर्ज EMI देखील सुमारे 5 वर्षांमध्ये प्रथमच कमी होऊ शकतो. आरबीआयचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांच्या अध्यक्षतेखालील चलनविषयक धोरण समितीचा पहिला निर्णय उद्या शुक्रवारी सकाळी घेतला जाणार आहे.

जर आरबीआय रेपो रेटमध्ये अनुमानित 25 बेसिस पॉइन्टसमध्ये कपात करू शकते. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू शकतो. कारण गेल्या दोन वर्षांपासून मध्यवर्ती बँकेने रेपो दर स्थिर ठेवलाय. नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये सादर करण्यात आलेल्या नवीन कर प्रणाली अंतर्गत कर सवलतीसह सरकारच्या घसरत्या महागाई आणि वाढ समर्थक उपाययोजनांद्वारे हे पाऊल उचलले गेले आहे.

रेपो रेटमध्ये कपात

रेपो रेट रिझर्व्ह बँकेकडून व्यावसायिक बँका किती दराने कर्ज घेतात हे ठरवतो आणि त्याचा थेट कर्जदरांवर परिणाम होत असतो. रेपो दरांमध्ये कपात केल्याने सामान्यत कर्ज घेण्याच्या खर्चात घट होत असते. किरकोळ आणि कॉर्पोरेट कर्जदारांना फायदा होत असतो. वापराला चालना देण्यासाठी सरकारने 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर सवलत जाहीर केली.

जर रेपो रेटमध्ये कपात झाली तर बाजारात आनंदाच वातावरण असेल. ऑक्टोबर 2024 मध्ये ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) महागाई दर 6.2% वरून डिसेंबर 2024 मध्ये 5.2% पर्यंत घसरून महागाई कमी होत आहे. जर महागाई आटोक्यात राहिली तर आणखी दर कपात होऊ शकते.

कर्जदारांवर काय परिणाम होईल?

रेपो रेट कपातीमुळे कर्जदारांना दिलासा मिळणार आहे. विशेषकरून फ्लोटिंग रेट होम लोन, वैयक्तिक कर्ज आणि व्यावसायिक कर्जे घेणाऱ्या ग्राहकांना फायदा होणार आहे. बँका ग्राहकांना किती लाभ देतात हे पत मागणी, ठेवींची वाढ आणि एकूण तरलता परिस्थिती यासारख्या घटकांवर अवलंबून असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT