नोकरी गेली तर घराचा हप्ता कसा भरायचा?
6 महिन्यासाठी ईएमआयचे कॅल्क्युलेशन वाचा
या ट्रिक वापरुन भरा तुमचा कर्जाचा हप्ता
प्रत्येक मध्यमवर्गीय नागरिकाचे स्वतः चे घर घेण्याचे स्वप्न असते. स्वतः चे घर घेणे हे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नसते. अनेकजण घर खरेदी करण्यासाठी होम लोनचा ऑप्शन निवडतात. होम लोनसाठी दर महिन्याला हप्ते जातात. त्यानुसार प्रत्येकजण महिन्याचे कॅल्क्युलेशन करतात. परंतु कधी काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे जर तुमची नोकरी गेली तुम्ही होम लोनचे हप्ते कसे भरणार याबाबत कॅल्क्युलेशन वाचा.
जर तुमचे उत्पन्न अचानक बंद झाले तर तुम्हाला धक्का बसणार आहे. तुमच्या घराचा लिलाव होऊ शकतो, अशी भीती अनेकांना वाटते. यामुळे अनेकजण घर सोडून जातात किंवा लपून बसण्यासाठी काहीतरी वेगळा मार्ग काढतात. दरम्यान, आता आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामळे तुम्हाला अशा परिस्थितींमध्ये आधार मिळू शकतो.योग्य आर्थिक नियोजन करुन तुम्ही हप्ते भरु शकतात.
नोकरी गेली तर हप्ता कसा भरायचा?
नोकरी गेली आणि पुढील काही महिन्याचे हप्ते आपल्या खिशाला परवडणार नसल्याचे तुम्हाला समजताच तुम्ही बँकेशी संपर्क साधा. बँकेला तुमची अडचण दाखवा. बँका तुमची अडचण समजून घेतात. तम्ही बँकेला ३ ते ६ महिन्याचा मोरेटोरियम किंवा पेमेंट हॉलिडे मागू शकतात. यामुळे नवीन नोकरी शोधण्यासाठी वेळ मिळाले.
नवीन नोकरी मिळाल्यानंतर तुम्ही हप्ता सुरु ठेवण्याबाबत बँकेशी बोला. तुम्हाला जर कमी पगाराची नोकरी मिळाली तर त्याबाबत बोलून घ्या. तुम्ही ईएमआयची मर्यादा वाढवून घेऊ शकतात. याआधी तुम्ही ४०,००० रुपये भरत असाल आणि आता अचानक २५,००० रुपयांचा हप्ता भरत असाल तर त्यासाठी कालावधी वाढवून घेऊ शकतात.
अनेकजण होम लोन घेताला गृहकर्ज संरक्षण योजना विकतात. परंतु संकाटाच्या काळात हीच गोष्ट तुमच्या कामाला येते. यामध्ये अनैच्छिक रोजगार गमावणे याचा समावेश असतो.यामुळे नोकरी गमावली तर विमा कंपनी पुढील तीन ते सहा महिन्यासाठी बँकेला ईएमआय देते.
पीएफ
तुम्ही पीएफचे पैसे काढू शकतात. ईपीएफओच्या नियमानुसार, जर तुम्ही बेरोजगार झाला तर १ महिन्यानंतर ७० टक्के रक्कम काढू शकतात. याचसोबत तुम्ही म्युच्युअल फंड आणि एसआयपीमधील पैसे काढू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.