Home Loan Interest Rate Saam Tv
बिझनेस

Home Loan: गृहकर्जावर या ५ बँका देताय जबरदस्त ऑफर, व्याजदर किती? पाहा संपूर्ण लिस्ट

Bank Loan Offer : घर घेताना बरेच लोक गृहकर्ज घेतात. लोन घेतल्यानंतर त्याचे EMI हप्ते फेडताना आपल्या नाकीनऊ येतात. जर तुम्ही देखील घर घेण्याचा विचार करत असाल तर काही बँका तुम्हाला होम लोन ऑफर करते.

कोमल दामुद्रे

Home loan Bank Interest Rate :

स्वत:चे घर असावे असे प्रत्येकाला वाटते. वाढती महागाई पाहाता स्वत: चे घर घेणे थोडे कठीणं. महागाईच्या वाढत्या किमती या गगनाला भिडल्या आहेत.

घर घेताना बरेच लोक गृहकर्ज घेतात. लोन घेतल्यानंतर त्याचे EMI हप्ते फेडताना आपल्या नाकीनऊ येतात. जर तुम्ही देखील घर घेण्याचा विचार करत असाल तर काही बँका तुम्हाला होम लोन ऑफर करते. कमी ऑफर आणि गृहकर्जावरील व्याजामुळे तुमच्या महिन्याचा EMI कमी होतो. होम लोनसाठी काही बँका जबरदस्त ऑफर देत आहेत तसेच त्यांचा व्याजदरातही सूट देण्यात येत आहे. जाणून घेऊया या बँकांबद्दल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. बँक ऑफ बडोदा

बँक ऑफ बडोदा (BOB)ने दिवाळीपूर्वीच (Diwali) आपल्या ग्राहकांसाठी 'बीओबी संग फेस्टिव्हल की उमंग' योजना राबवली होती. बँकेची ही सुविधा ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत असणार आहे. या सुविधेत बँक अत्यंत आकर्षक व्याजदरात होम लोन (Loan), वैयक्तिक कर्ज, कार लोन आणि शैक्षणिक लोन देत आहे.

2. SBI होम लोन

स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सगळ्यात मोठी बँक (Bank) आहे. सध्या बँक आपल्या ग्राहकांना ०.१७ टक्के प्रक्रिया शुल्कासह वार्षिक ८.४० टक्के दराने होम लोन देते आहे. SBI होम लोनवर ६५ बेस पॉइंट्स म्हणजेच ०.६५ टक्के सूट देत आहे. ही सवलत नियमित होम लोन, Flexipay, NRI साठी उपलब्ध आहे. या लोनचा ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत लाभ घेऊ शकता.

3. पंजाब नॅशनल बँक

PNB बँक आपल्याला ग्राहकांना विशेष सवलत देत आहे. ही बँक ग्राहकांना ८.४० ते १०.६० टक्के व्याजदर देत आहे.

4. इंडियन बँक

इंडियन बँक ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. ही बँक गृहकर्जावर ८.५० ते ९.९० टक्के दराने व्याज देत आहे. यावरील प्रक्रिया शुल्क रकमेच्या ०.२३ टक्के इतकी आहे.

5. ICICI बँक

ICICI बँक ही खाजगी क्षेत्रातील बँक असून जी ग्राहकांना कर्ज देत आहे. ज्या ग्राहकांचे CIBIL स्कोर ७५०-८०० च्या मध्ये आहे. त्यांच्यासाठी गृहकर्जाचा व्याजदर हा ९ टक्के इतका आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे याआधी एकाच मंचावर कधी आणि कुठे आले होते?

Marathi bhasha Vijay Live Updates : सर्व विसरून ठाकरे बंधू एकत्र ही मोठी गोष्ट, तेजस्विनी पंडीतचं विधान

Sushil Kedia: राज ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Metro In Dino : 'मेट्रो इन दिनों'ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT