HDFC Bank Google
बिझनेस

HDFC बँकेच्या कर्जदारांना मोठा झटका; Home Loan, Car Loan वर भरावे लागणार जास्त व्याज

HDFC Increases MCLR: देशातील सर्वात मोठी खाजगी बँक एचडीएफसीने एक मोठा निर्णय घेतला आहे. एचडीएफसी बँकेने MCLR वाढवला आहे. याचा परिणाम कोट्यवधी ग्राहकांवर होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

HDFC Bank Will Increase MCLR effect On Home Loan:

देशातील सर्वात मोठी खाजगी बँक एचडीएफसीने एक मोठा निर्णय घेतला आहे. एचडीएफसी बँकेने MCLR वाढवला आहे. याचा परिणाम कोट्यवधी ग्राहकांवर होणार आहे. MCLR वाढल्याने ग्राहकांच्या कर्जाचा EMI वाढणार आहे.

एचडीएफसी बँकेने एमसीएलआर वाढवला आहे. यामुळे ग्राहकांना गृहकर्ज, कार कर्ज, वैयक्तिक कर्ज यांवरचा ईएमआय वाढणार आहे. नवीन कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त व्याजदर द्यावे लागणार आहे. त्यामुळे बँकेतून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. हे नवीन दर उद्या म्हणजेच ८ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. (Latest News)

एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटनुसार, MCLR 5 bps ८.८० टक्क्यांवरुन ८.९० टक्क्यांनी वाढवला आहे. एका महिन्याचा MCLR 5 bps ८.८५ टक्क्यांवरुन ८.९० टक्क्यांनी वाढला आहे. तर तीन महिन्यांचा MCLR बेस पॉइंट ८.१० टक्क्यांनी वाढवला आहे. तर सहा महिन्यांचा MCLR ९.३० टक्के झाला आहे.

MCLR म्हणजे काय?

MCLR म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड (Marginal Cost Of Fund). बँकेकडून घेतल्या जाणाऱ्या कर्जावर MCLR आकारला जातो. ठेवी दर, रेपो रेट, ऑपरेशनल कॉस्ट यांच्या आधारावर MCLR ठरवले जाते. याचा परिणाम कर्जाच्या व्याजदरावर होतो. त्यामुळे कर्जदाराचा EMI वाढतो.

MCLR वाढीचा परिणाम गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्जांच्या व्याजदरावर दिसून येईल. यामुळे ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय भरावा लागेल. तसेच नवीन कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना जास्त व्याजदर भरावे लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT