HDFC Bank Google
बिझनेस

HDFC FD Rate: एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर; FD वरील व्याजदरात वाढ

HDFC FD Rate Increases: प्रत्येकजण आपलं भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी वेगवेगळ्या एफडीमध्ये गुंतवणूक करतात. एफडीएफसी बँकेत एफडीचे व्याजदर वाढवण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांना फायदा होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

HDFC Bank FD Rate Increases:

प्रत्येकजण आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व्हावे यासाठी वेगवेगळ्या एफडीमध्ये गुंतवणूक करतात. देशातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसीने ग्राहकांसाठी एक खुशखबर दिली आहे. बँकेने एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे.

RBI च्या चलनविषयक धोरणाच्या बैठकीनंतर एचडीएफसी बँकेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बँकेने एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. २ ते ५ कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवरील व्याजदरात ही सुधारणा करण्यात आली आहे. एचडीएफसी बँक ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंत एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देते. बँकेने एफडीवरील व्याजरात २५ बेसिसि पाँइट्स म्हणजेच ०.२५ टक्क्यांनी वाढ केली आहे. ही वाढ काही कालावधीच्याच एफडीवर करण्यात आली आहे. हे नवीन दर ९ फेब्रुवारीपासून लागू करण्यात आले आहेत. (Latest News)

एचडीएफसी बँकेने या एफडीवर व्याजदर वाढवले

बँके ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतच्या एफडीवर ३.५० ते ७.७५ टक्के व्याज देत आहे. बँकेने नुकतेच १८ ते २१ महिन्यांच्या एफडीवरील व्याज ७ टक्क्यांवरुन वाढवून ७.२५ टक्के केले आहे.

एचडीएफची बँकेचे एफडीवरील व्याजदर

७ दिवस ते १४ दिवस

सामान्य लोकांसाठी ३ टक्के व्याज ठेवण्यात आले आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ३.५० टक्के व्याज देण्यात आले आहे.

१५ दिवस ते २९ दिवस

सामान्य नागरिकांसाठी ३ टक्के व्याज ठेवण्यात आले आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ३.५० टक्के व्याजदर ठेवण्यात आले आहे.

३० दिवस ते ४५ दिवस

सामान्य नागरिकांसाठी ३.५०टक्के व्याज ठेवण्यात आले आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ४ टक्के व्याजदर ठेवण्यात आले आहे.

४६ दिवस ते ६० दिवस

सामान्य नागरिकांसाठी ४.५० टक्के व्याज ठेवण्यात आले आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ५ टक्के व्याजदर ठेवण्यात आले आहे.

६१ दिवस ते ८९ दिवस

सामान्य नागरिकांसाठी ४.५० टक्के व्याज ठेवण्यात आले आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ५ टक्के व्याजदर ठेवण्यात आले आहे.

९० दिवस ते ६ महिने

सामान्य नागरिकांसाठी ४.५० टक्के व्याज ठेवण्यात आले आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ५ टक्के व्याजदर ठेवण्यात आले आहे.

६ महिने ते ९ महिने

सामान्य नागरिकांसाठी ५.७५ टक्के व्याज ठेवण्यात आले आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ६.२५ टक्के व्याजदर ठेवण्यात आले आहे.

९ महिने ते १ वर्ष

सामान्य नागरिकांसाठी ६ टक्के व्याज ठेवण्यात आले आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ६.५० टक्के व्याजदर ठेवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Exit Poll : सावंत की पडळकर? मतदारांचा कौल कुणाला, पाहा एक्झिट पोल VIDEO

Arjuni Morgaon Exit Poll : अर्जुनी मोरगाव मतदारसंघात कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: औसामध्ये भाजपचे अभिमन्यू पवार होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra exit polls : माकप डहाणूचा गड राखणार का? कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Solapur Exit Poll: सोलापूर दक्षिण मतदारसंघातून कोण होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

SCROLL FOR NEXT