HDFC Bank  Saam Tv
बिझनेस

HDFC Bank : HDFCच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; २३ ऑगस्टला काही सेवा राहणार बंद

Banking Update : एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना महत्वाची सूचना देण्यात आली आहे. २२ ऑगस्ट रात्री ते २३ ऑगस्ट सकाळी बँकेच्या काही डिजिटल सेवा सिस्टम अपग्रेडसाठी बंद राहणार आहेत. व्यवहार आधी पूर्ण करण्याचा सल्ला.

Sakshi Sunil Jadhav

मुंबई : एचडीएफसी बँकेने आपल्या लाखो ग्राहकांना एक महत्वाची माहिती दिली आहे. बँकेने जाहीर केलेल्या सल्लागारानुसार, २२ ऑगस्ट रात्री ११ वाजेपासून ते २३ ऑगस्ट सकाळी ६ वाजेपर्यंत म्हणजे तब्बल सात तास बँकेच्या काही सेवा तात्पुरत्या बंद करण्यात येणार आहेत . याचे कारण केवळ नियमित सिस्टम अपग्रेडसाठी असून बँकेच्या डिजिटल पायाभूत सुविधांची गुणवत्ता व सुरक्षितता वाढवणे हाच उद्देश असल्याचे एचडीएफसी बँकेने स्पष्ट केले आहे.

कोणत्या सेवा उपलब्ध नसणार?

ग्राहक या काळात फोन बँकिंग आयव्हीआर, ईमेल सपोर्ट, सोशल मीडिया चॅनेल, व्हॉट्सअॅप चॅट बँकिंग आणि एसएमएस बँकिंग या सेवा उपलब्ध राहणार नाहीत. मात्र, हरवलेल्या किंवा फसव्या खात्यांची व कार्डांची तक्रार नोंदवण्यासाठीची टोल-फ्री हेल्पलाइन नेहमीप्रमाणे सुरु राहील.

इतर सेवांमध्ये बदल

याशिवाय, २२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ वाजता ते पहाटे १.३० वाजेपर्यंत यूपीआय व्यवहारांवर परिणाम होणार आहे. या काळात एचडीएफसी बँकेच्या खात्यांद्वारे आणि रुपे क्रेडिट कार्डद्वारे केले जाणारे यूपीआय पेमेंट्स तसेच मोबाईल बँकिंग अॅप किंवा थर्ड-पार्टी अॅप्स जसे की GPay, PhonePe, Paytm यांच्यामार्फत होणारे व्यवहार थांबणार आहेत. व्यापाऱ्यांसाठी एचडीएफसी-लिंक्ड यूपीआय पेमेंट्सही या वेळेत कार्यरत राहणार नाहीत.

ग्राहक मात्र नेटबँकिंग, मोबाईल बँकिंग अॅप, पेझॅप, माय कार्ड तसेच थेट एजंट फोन बँकिंग यांचा वापर कोणत्याही अडथळ्याशिवाय करू शकतील. बँकेने ग्राहकांना सूचित केले आहे की, कोणतेही महत्त्वाचे व्यवहार या नियोजित डाउनटाइमपूर्वी पूर्ण करावेत, जेणेकरून गैरसोय टाळता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: आता उद्धव ठाकरेंचं मिशन मराठवाडा, शेतकऱ्यांसाठी ठाकरे रस्त्यावर उतरणार?

Mumbai Crime: आरे कॉलनीत डान्सरवर बलात्कार; सराव करताना नृत्य प्रशिक्षकाची नियत फिरली, दारू पाजली नंतर...

Thane Crime : ठाण्यातील उपायुक्ताला २५ लाखांच्या लाचखोरीत अटक; आता फरार सुशांत अडकला

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना ऑक्टोबरचा हप्ता कधी?

Saturday Horoscope : मनातील इच्छा पूर्ण होणार; धन योगाला उत्तम दिवस; या राशींच्या लोकांचे नशीब पालटणार

SCROLL FOR NEXT