Sakshi Sunil Jadhav
Whatsappहे सगळ्यात लोकप्रिय संवादाचे साधन मानले जाते.
Whatsappवर आपण मेसेज, व्हिडीओ कॉलिंगचा वापर सहज करु शकतो.
पुढे Whatsappमध्ये अनेक बदल होत गेले आणि अनेक सुविधा सुद्धा आल्या.
आम्ही अशाच फीचरबद्दल बोलत आहोत जे नुकतेच Whatsappमध्ये सुरु झाले आहे.
फीचरचे नाव म्हणजे स्क्रीन शेअर मिरर. यात तुम्हाला स्कॅमर्स अडकवू शकतात. सगळ्यात आधी तुम्हाला फोन करतात. ते बॅंक, आधार किंवा इतर कोणत्याही एजन्सीच्या नावाने कॉल करतात.
यामध्ये स्कॅमर्स तुम्हाला Whatsapp कॉल व्हिडीओ कॉल करुन स्क्रीन शेअर करायला सांगतात.
पुढे तुम्हाला एखादे App घ्यायला लावून बॅंकेचे डीटेल्स काढून घेऊ शकतात. म्हणून कोणालाही कॉल केल्यावर जमल्यास सगळ्या गोष्टी स्क्रीनवर दाखवू नका.