GST  Saam Tv
बिझनेस

GST: सर्वसामान्यांना दिलासा! १२ आणि २८ टक्के जीएसट रद्द होणार; या वस्तूंच्या किंमती होणार कमी

GST 12 and 28 Slab will Cut: सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता जीएसटीमधील १२ आणि २८ टक्के स्लॅब रद्द होण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

काल पंतप्रधान मोदींनी मोठी घोषणा केली. दिवाळीस सर्वसामान्यांना गिफ्ट मिळणार आहे. जीएसटीमध्ये बदल करणार आहे. जीएसटीचे स्लॅब पुन्हा नव्याने तयार करण्यात येणार आहे. यामुळे सर्वसामान्यांना फायदा होणार आहे, असं सांगितलं आहे. दरम्यान,या नवीन GST 2.0 मध्ये १२ आणि २८ टक्के जीएसटी स्लॅब रद्द केला जाणार आहे.

या नवीन जीएसटी प्रणालीमुळे अनेक गोष्टी स्वस्त होणार आहे. रोजच्या वापरातील वस्तूंवरील जीएसटी कमी होणार आहे. परिणामी नागरिकांना कमी टॅक्स द्यावा लागणार आहे.

८ वर्षांपूर्वी जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पहिल्यांदाच जीएसटीच्या रचनेत मोठा बदल केला जाणार आहे. नव्या रचनेनुसार, जीएसटीमधील ५ आणि १८ टक्के स्लॅबची करआकारणी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोजच्या वापरातील वस्तू आणि सेवांवर परिणाम होणार आहे. तसेच मार्चच्या शेवटपर्यंत भरपाई कपकर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आलिशान मोटारींसारख्या आणि तंबाखुसारख्या म्हणजेच (सीन गुड्स)वर ४० टक्के दर लागू होईल.

अन्नपदार्थ, औषधे, मेडिकल डिव्हाइस, स्टेशनरी आणि अभ्यासानिगडित प्रोडक्ट्स, केसांचे तेल, टूथब्रथ यावरील टॅक्स रद्द केला जाईल किंवा ५ टक्के आकारला जाईल, असंएका अधिकाऱ्यांनी सांगितले. एसी,टीव्ही आणि फ्रिजवरील स्लॅब १८ टक्के होण्याची शक्यता आहे. याचसोबत हेल्थ इन्श्युरन्सवरील जीएसटीमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. २८ टक्के कर टप्प्यातील ९० टक्के वस्तू या १८ टक्के दराच्या श्रेणीत हलवल्या जातील. त्यामुळे १२ आणि २८ टक्के जीएसटी रद्द केला जाणार आहे.

वस्तू आणि सेवांचे मानक आणि गुणवत्ता म्हणून दोन निकषांवर वर्गीकरण केले जाणार आहे, त्यावर लागू होणाऱ्या करातदेखील दोन टप्पे असतील. तसेच काही निवडक वस्तूंवर विशेष कर आकारले जाऊ शकतात, असंही अर्थमंत्रालयाने सांगितलं आहे. जीएसटी दर सुसुत्रीकरणासोबतच सुधारणा आणि जीवनमान सुलभता यावर भर दिला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha News : मनाला चटका लावणारी घटना; शेतावर फवारणीसाठी गेलेल्या तरूण शेतकऱ्याचा मृत्यू

Crime News: घरात चोर शिरल्याचा संशय, नवऱ्यानं उघडला बायकोच्या रुमचा दरवाजा, दृश्य पाहून धक्काच बसला

Maharashtra Live News Update: पीक विम्याचे निकष बदलण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार - मंत्री दत्तात्रय भरणे

Weight Gain : वजन वाढवण्यासाठी गाईचे दूध प्यावे की म्हशीचे दूध?

Dahi handi : एक गाव-एक दहीहंडी! पण फोडण्याची हटके पद्धत, इथे विहिरीत उडी मारून फोडली जाते दहीहंडी; Video

SCROLL FOR NEXT