ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकालची बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे बरेच लोक हृदयाशी संबधित आजारांना बळी पडत आहेत. यामध्ये हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
हृदयाशी संबधित आजार होण्याआधी शरीर आपल्याला काही संकेत देत असतं. याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. याची लक्षणे कोणती, जाणून घ्या.
जर तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय सतत थकवा जाणवत असेल तर या लक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. हे हृदय आजारी असल्याचे संकेत आहे.
अनेकदा अन्नाचे पचन व्यवस्थित न झाल्यामुळे मळमळ आणि उलट्या होतात. परंतु हृदयविकाराचा आजार असल्यास उलटी होणेचा त्रास होऊ शकतो.
छातीत जळजळ हृदयाशी संबंधित आजारांमुळे देखील होऊ शकते. त्याकडे दुर्लक्ष करू नका.
जेव्हा आपले शरीर कमकुवत होते किंवा आपला रक्तदाब कमी होतो तेव्हा आपल्याला चक्कर येऊ शकते. परंतु, हृदयरोगामुळे देखील चक्कर येऊ शकते.
मोठ्याने घोरणे हे देखील हृदयरोगाचे लक्षण आहे. कारण, अशावेळी शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण खूप कमी होते. हे लक्षण दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.