GST Rate Cuts Saam Tv
बिझनेस

GST Rate Cuts: मोठी बातमी! AC, TV, पनीर, दूध झाले स्वस्त; जीएसटी टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल; निर्मला सितारामन आज करणार घोषणा

GST Rate Cuts These Items Get Cheaper: काल झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत मोठा निर्णय झाला आहे. यामध्ये १२ टक्के आणि २८ टक्के टॅक्स स्लॅब रद्द करण्यात आले आहेत. यामुळे अनेक गोष्टी स्वस्त झाल्या आहेत.

Siddhi Hande

जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

आता फक्त २ टॅक्स स्लॅब असणार

१२ टक्के आणि २८ टक्के टॅक्स स्लॅब रद्द

या गोष्टींवर झाल्या स्वस्त

सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना होणार फायदा

३ सप्टेंबर रोजी जीएसटी कौन्सिलची (GST Council) बैठक झाली. या ५६ व्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामान यांनी जीएसटी बैठकीत झालेल्या निर्णयाबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांचा विचार करत फक्त दोन टॅक्स स्लॅबला (GST Tax Slab) मंजुरी दिली आहे. यावर बैठकीतील सर्व सदस्यांनी मंजुरी दिली आहे. हा नवीन टॅक्स स्लॅब २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आता अनेक जीवनावश्यक गोष्टी या स्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे महागाई थोड्याफार प्रमाणात कमी होईल. या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तो म्हणजे जीएसटीमधील १२ आणि २८ टक्के टॅक्स स्लॅब काढून टाकण्यात आला आहे. यामुळे या श्रेणीतील वस्तूंवर आता कमी टॅक्स लागणार आहे.

कोणत्या गोष्टी स्वस्त? (Which Items Cheaper)

या वस्तूंवर फक्त ५ टक्के टॅक्स (GST Tax Slab Reform These Items Have Only 5% Tax)

दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे मध्यमवर्गीय लोकांना खूप फायदा होणार आहे. काही गोष्टींवर फक्त ५ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. यामध्ये शॅम्पू, तेल याचसोबत रोजच्या वापरातील वस्तूंचा समावेश आहे. याचसोबत नमकीन पदार्थ, पास्ता, कॉफी, नूडल्स यावरील टॅक्स स्लॅब ५ टक्के करण्यात आला आहे. थर्मामीटर आणि ग्लूकोमीटरवर फक्त १८ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. चीज, बटरवरील टॅक्स १२ टक्क्यांवरुन ५ टक्के करण्यात आला आहे.

बाइकपासून ते सिमेंट या गोष्टी स्वस्त (Bike, Cement Price Cut)

२८ टक्के टॅक्स स्लॅबमधील अनेक गोष्टींना १८ टक्के टॅक्स स्लॅबमध्ये सहभागी केले आहे. यामध्ये कार, फ्रीज, एसीचा समावेश आहे. यावरील कर १० टक्क्यांनी कमी केला आहे. याचसोबत सिमेंटवरील टॅक्स स्लॅब १० टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. 350cc बाइक आणि ऑटो पार्ट्सच्या जीएसटीमध्येही कपात झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून भाऊबीज गिफ्ट; २००० रुपये मिळणार

Maharashtra Live News Update: २६ ऑक्टोबरपासून नाशिक-दिल्ली आणि हैदराबाद मार्गावर प्रत्येकी २ फ्लाइट

Jio New Recharge Plan: भन्नाट ऑफर! १०० रुपयांत मिळणार हजारो रुपयांचे फायदे; डेटा, मनोरंजन आणि अतिरिक्त ऑफर्स फ्री

Success Story: सरकारी नोकरी सोडली, UPSC परीक्षेत दोनदा फेल, जिद्द नाही सोडली, तिसऱ्या प्रयत्नात IAS; सर्जना यादव यांचा प्रवास

Asia Cup 2025 Final: भारत आणि पाकिस्तानमध्ये फायनल,आशिया कप स्पर्धेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT