GST Council: जीएसटी कौन्सिलची आज बैठक! कपडे, शूजपासून ते कारपर्यंत कोणत्या गोष्टी स्वस्त होणार?

GST Council Meeting: आज जीएसटी कौन्सिलची बैठक होणार आहे. यामध्ये २ टॅक्स स्लॅब रद्द होण्याची शक्यता आहे. कपडे, शूज, कारच्या किंमती कमी होणार आहे.
GST Council
GST CouncilSaam Tv
Published On
Summary

आज जीएसटी कौन्सिलची बैठक

१२ आणि २८ टक्के जीएसटी स्लॅब रद्द होण्याची शक्यता

कपड्यांपासून ते कारवरील जीएसटी होणार कमी

आज जीएसटी कौन्सिलची बैठक होणार आहे.या जीएसटी बैठकीत कर स्लॅबमध्ये बदल केले जाणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांना मात्र दिलासा मिळणार आहे. १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्रदिनी पंतप्रधान मोदींनी जीएसटी रचनेत व्यापक सुधारणा करण्याची घोषणा केली होती. त्याच पार्श्वभूमीवर ही जीएसटी परिषदेची बैठक महत्त्वाची ठरणार आहे.

GST Council
GST : छत्र्या, मोबाइल, कपडे ते सायकल, सिमेंट होणार स्वस्त, वाचा केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन

जीएसटी परिषदेच्या या बैठकीत दैनंदिन वापरातील वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. यामध्ये तूप, बटर, टूथपेस्ट, शॅम्पू, चीज, दूध, पावडर, सिमेंट आणि कारच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. या वस्तूंवरील जीएसटी दर कमी केला जाऊ शकतो. यामुळे थेट सर्वसामान्य ग्राहकांना आणि लहान व्यावसायिकांना फायदा होणार आहे.

GST Council
GST Reform: भारतात मोबाईल स्वस्त दरात मिळणार? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

२८ आणि १२ टक्के स्लॅब रद्द होण्याची शक्यता (28 and 12% Tax Slab To Be Remove)

जीएसटी कौन्सिलच्या या बेठकीत २ स्लॅब कमी करण्याची घोषणा केली जाऊ शकते. २८ आणि १२ टक्के स्लॅब रद्द करुन त्याऐवजी ५ आणि १८ टक्के स्लॅब ठेवण्यात येईल. सध्या २५० पेक्षा जास्त वस्तूंवर १२ टक्के कर लागतो. त्यापैकी २२३ वस्तू ५ टक्के आणि उर्वरित वस्तू १८ टक्के स्लॅबमध्ये ठेवण्यात येईल. त्याचप्रमाणे ३० वस्तू या २८ टक्के स्लॅबमध्ये आहेत. त्यावर १८ टक्के स्लॅब लावण्यात येण्याची शक्यता आहेत. ज्या उत्पादनावर सध्या २८ टक्क्यांपेक्षा कमी कर आकारला जातो. त्यात वाहनांचे पार्ट्स, एसी, टेलिव्हिजन, मोटारसायकल यांचा समावेश आहे.

कपडे, शूजपासून ते कारपर्यंत या गोष्टी होणार स्वस्त (Clothes, Shoes And Cars Price To Drop)

जीएसटी कौन्सिलच्या या बैठकीत कपडे ५ टक्के कर स्लॅबमध्ये समावेश करण्याची शक्यता आहे. याचसोबत अन्नपदार्थांवरील जीएसट कमी केला जाऊ शकतो. सिमेंटवरील जीएसटीदेखील कमी केली जाऊ शकतो. सध्या यावर २८ टक्के जीएसटी आकारला जातो. हा १८ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. याचसोबत टर्म इन्श्युरन्स आणि आरोग्य विम्यावरील जीएसटी रद्द केला जाऊ शकतो.

GST Council
GST Reform: टीव्ही, फ्रीज, एसीसह ग्राहक वस्तू होणार स्वस्त;जीएसटीचे दोन स्लॅब रद्द होणार|VIDEO

कारवरील जीएसटी १० टक्क्यांनी होणार कमी

वाहनांवरील जीएसटी दर २८ वरुन १८ टक्के होण्याची शक्यता आहे. सध्या या वाहनांवर २८ टक्के जीएसटी आणि २२ टक्के उपकर आकारला जातो. यामध्ये कपात केली जाऊ शकतो. या वाहनांवर सध्या ५० टक्के कर भरावा लागतो. जर जीएसटी दर कमी झाला तर एकूण दर ४० टक्के होईल. यामुळे कार खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

GST Council
GST Council: ४८ तासात खुशखबर मिळणार, मोबाईलपासून ते कपडे; १७५ वस्तू स्वस्त होणार, GST बैठकीत मोठा निर्णय घेणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com