GST Council Saam Tv
बिझनेस

GST Council: ४८ तासात खुशखबर मिळणार, मोबाईलपासून ते कपडे; १७५ वस्तू स्वस्त होणार, GST बैठकीत मोठा निर्णय घेणार

GST Reforms: जीएसटी कौन्सिलची बैठक उद्या आणि परवा होणार आहे. या बैठकीत जीएसटीबाबत महत्त्वाची निर्णय होण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

जीएसटी कौन्सिलची ३ आणि ४ सप्टेंबर रोजी बैठक

अनेक वस्तूंवरील जीएसटी १० टक्क्यांनी होणार कमी

एसी, हायब्रिड कारवरील जीएसटीमध्ये कपात

सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ३ आणि ४ सप्टेंबर रोजी जीएसटी कौन्सिलची बैठक होणार आहे. या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीत अनेक उत्पादनांवरील कर १० टक्के किमान कपात करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत हिंदुस्तान टाईम्सने वृत्त दिले आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, जवळपास १७५ वस्तूंवरील करात कपात केली जाणार आहे. या वस्तूंवरील कर जवळपास १० टक्क्यांनी कमी केली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये हायब्रिड कार ते एसी अशा अनेक वस्तूंचा समावेश आहे.

या वस्तूंवरील कर होणार कमी (GST Rate Reduce On These Products)

  • मिडिया रिपोर्टनुसार, टॅलक्म पावडर, टूथपेस्ट आणि शॅम्पू यांसारख्या पर्सनल केअर उत्पादनांवरील जीएसी कमी होण्याची शक्यता आहे. हा जीएसटी १८ टक्क्यांवरुन ५ टक्के केला जाऊ शकतो. यामध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर आणि गोदरेज इंडस्ट्रीजला चालना मिळेल.

  • एसी आणि टीव्ही या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरील जीएसटीदेखील १० टक्क्यांनी कमी होऊ शकते. हा जीएसटी २८ टक्क्यांवरुन १८ टक्के केला जाऊ शकतो. यामुळे सॅमसंग, एजली या कंपन्यांना फायदा होईल.

  • लहान हायब्रिड कारवरील जीएसटी २८ टक्क्यांवरुन १८ टक्के केला जाऊ शकतो. यामध्ये १० टक्क्यांनी कपात केली जाईल. यामुळे मारुती सुझुकी लिमिटेड आणि टोयोटा या कंपन्यांना फायदा होईल.

जीएसटी सुसूत्रीकरण (GST Reforms)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी काउन्सिलची बैठक होणार आहे. ३ ते ४ तारखेला ही बैठक होणार आहे. यामध्ये जीएसटीबाबत निर्णय घेतला जाईल. यामध्ये दैनंदिन वस्तूंवरील कर कमी करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Accident: रेसच्या नादात भाजप नगरसेवकाच्या मुलाने घेतला दाम्पत्याचा जीव; अपघाताचा थरारक CCTV Video आला समोर

दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी सरकारचा अॅक्शन प्लॅन तयार; जलसंधारणाच्या कामांना मिळणार वेग

भाजपच्या महिला आमदाराला विषबाधा; व्हेंटिलेटरवर उपचार, प्रकृती चिंताजनक

कॅन्सरग्रस्तांसाठी आशेचा नवा किरण; कॅन्सरला हरवणं शक्य, क्लिनिकल ट्रायलमध्ये शास्त्रज्ञांना मोठं यश

कारवाईनंतरही पुन्हा अतिक्रमण केल्यास गुन्हा; पुणे मनपा आयुक्तांचा व्यापाऱ्यांना कठोर इशारा

SCROLL FOR NEXT