ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पायलट्सना हवेत विमान उडवताना खूप काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी पायलटसाठी काही गोष्टी पूर्णपणे बंदी आहेत.
हवेत विमान उडवताना पायलट्सचे लक्ष केंद्रित रहावे, यासाठी विमानात पायलट्साठी काही गोष्टी नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. या गोष्टी कोणत्या, जाणून घ्या.
फरफ्यूमच्या तीव्र वासामुळे पायलटचे लक्ष विचलित होऊ शकते आणि हे प्रवासादरम्यान घातक ठरु शकते. तसेच विमान प्रवासापूर्वी पायलटची अल्कोहोल चाचणी केली जाते.
परफ्यूममधील अल्कोहोलमुळे चाचणीचा निकाल सकारात्मक आला तर पायलटला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. याशिवाय, अनेक प्रवाशांना तीव्र वासाची ऍलर्जी असते, त्या प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
परफ्यूम, सॅनिटायझर, माउथवॉश, टूथपेस्ट व्यतिरिक्त कोणतेही औषध किंवा फॉर्म्युलेशन किंवा कोणत्याही प्रकारचे सुगंधी पदार्थ विमानात नेण्यास बंदी आहे.
डीजीसीएच्या प्रस्तावात म्हटले आहे की, जर कोणताही क्रू मेंबर किंवा पायलट कोणतेही औषध घेत असेल तर त्याने विमान उड्डाण करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.