GST  Saam Tv
बिझनेस

GST चा १२ टक्के स्लॅब रद्द होणार? AC, ट्रॅक्टरसह विमा स्वस्त होण्याची शक्यता

GST Council Meeting: जीएसटी काउंसिलची बैठक येत्या दोन आठवड्यात होणार आहे. यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहे. यामध्ये कदाचित १२ टक्के टॅक्स स्लॅब रद्द करण्याचीही घोषणा केली जाऊ शकते.

Siddhi Hande

सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या दोन आठवड्यात जीएसटी काउसिंलची मिटिंग होऊ शकते. या दर सुसूत्रीकरण हे मूख्य वैशिष्ट असेल. या जीएसटी काउंसिलच्या बैठकीमध्ये मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.

या बैठकीत टॅक्स कमी करण्यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे. मिडिया रिपोर्टनुसार,जीएसटी काउन्सिलच्या बैठकीत काही जीएसटी स्लॅब रद्द होण्याची शक्यता आहे.

  • १२ टक्के जीएसटी स्लॅब रद्द केला जाऊ शकतो

  • या टॅक्स स्लॅबमधील गोष्टींवर ५ टक्के किंवा १८ टक्के टॅक्स स्लॅब लागू शकतो

  • सध्या विमा योजनांवरील १८ टक्के जीएसटी रद्द करण्याचा प्रस्ताव सरकार विचारात घेऊ शकतो

  • सरकार एअर कंडिशनिंगसारख्या उत्पादनावरील २८ टक्के स्लॅब कमी करण्याचा विचार करु शकतो

जीएसटी रोडमॅप

जीएसटी लागू झाल्यानंतर राज्याचा महसुलातील तोटा भरुन काढण्यासाठीचा भरपाई उपकर मार्चमध्ये संपणार आहे. त्यामुळे या उपकराची जागी कदाचित दोन नवीन कर आकारले जाऊ शकतात. यामध्ये एक आरोग्य उपकर आणि स्वच्छ उपकर असू शकतो.

कार आणि एसयूव्हीवर लागू असलेल्या भरपाई कराबाबत, भरपाई उपकर संपल्यानंतर त्यांना करात कोणतीही कपात अपेक्षित नाहीये.

१२ टक्के स्लॅब काढू टाकल्यानंतर ट्रॅक्टर, एसी या गोष्टी खरेदीवर फायदा होऊ शकतो. या वस्तूंवर ५ टक्के स्लॅब लावण्याची शक्यता जास्त आहे. यामुळे ट्रॅक्टर हा खरेदी करणे सर्वसामान्यांच्या खिशाला अजून परवडणारा होणार आहे.

या गोष्टी होणार स्वस्त

तसेच सध्या एसीवर २८ टक्के कर आकारला जात आहे. या करातदेखील कपात होण्याची शक्यता आहे. टर्म लाइफ इन्श्युरन्ससाठी जीएसटी १८ टक्क्यांवरुन ५ टक्के केला जाई शकतो. तसेच विमा कंपन्यांन इनपुट क्रेडिटचा दावा करण्याची परवानगीदेखील मिळू शकते.Nomura यांनी याबाबत माहिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT