GST Slab: जेवणावर ५ टक्के, आइसक्रीमवर १८ टक्के GST; स्लॅबमध्ये बदल करण्याची मागणी

GST Slab News: जीएसटी स्लॅबमध्ये बदल करण्याची मागणी करण्यात येत आहे. सर्व अन्नपदार्थांवर समान कर लावावा, असं सांगितलं जात आहे. वेगवेगळा कर स्लॅब असल्याने ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो.
GST Collection
GST Collection Saam Digital
Published On

भारतात सर्व गोष्टींवर आता जीएसटी कर लावला जातो. प्रत्येक गोष्टींवर वेगवेगळा कर लावला जातो. जर तुम्ही बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जात असाल तर त्यावर ५ टक्के जीएसची लावला जातो. आईस्क्रिमवर १८ टक्के जीएसटी लागला जातो. याचसोबत तुम्ही एसी असलेल्या रेस्टॉरंटमध्ये जेवण जेवलात तर सर्व जेवणावर १८ टक्के जीएसटी लावला जातो.

कपड्यांवर वेगवेगळा जीएसटी लावला जातो. जर तुम्ही १००० रुपयांपर्यंतचे कपडे खरेदी करत असाल तर यावर वेगळा जीएसटी लावला जातो. जर तुम्ही त्यापेक्षा जास्त किंमतीचे कपडे खरेदी करत असाल तर त्यावर वेगळा जीएसटी (GST) लावला जातो.

GST Collection
PM Vidyalaxmi Scheme: शिक्षणासाठी कोणत्याही हमीशिवाय १० लाखांचे कर्ज; पीएम विद्यालक्ष्मी योजना आहे तरी काय?

खुल्या अन्नपदार्थांवर कोणताही टॅक्स भरावा लागत नाही परंतु पॅक फूड गोष्टींवर टॅक्स द्यावा लागतो. चप्पलांवरदेखील टॅक्स द्यावा लागतो. वेगवेगळ्या वस्तूंवर वेगवेगळा जीएसटी आकारला जातो त्यामुळे अनेक संभ्रम निर्माण होतो.त्यामुळे अनेकदा व्यापाऱ्यांकडून चुका होतात. याचसोबत ग्राहकांच्या मनातदेखील त्यांची फसवणूक झाल्यासारखे वाटते.

यामुळे जीएसटीचे दर कमी करण्यासोबत त्याबाबतचा संभ्रम दूर करणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. तज्ञांच्या मते, जीएसटी काउन्सिलच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली आहे. मात्र, अद्या प कोणताी निर्णय घेण्यात आलेला नाही. या बैठकीत पेट्रोलियम उत्पादनांवर जीएसटी लावण्याचीही चर्चा झाली होती.

GST Collection
Tax Saving : 80C अंतर्गत फायदा, १.५ लाखांपर्यंत वाचवा टॅक्स; कुठे कुठे गुंतवणूक कराल? जाणून घ्या सविस्तर

चारऐवजी तीन स्लॅब असावेत

याबाबत केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे माजी अध्यक्ष विवेक जोहरी यांनी सांगितले की, जीएसटीमध्ये चार स्लॅबऐवजी तीन स्लॅब असावेत. सर्व अन्नपदार्थांसाठी एकच जीएसटी असावा. यामुळे संभ्रम दूर होईल.

याबाबत डेलाइटचे भागीदार हरप्रीत सिंग यांनी सांगितले की, जीएसटी स्लॅबमध्ये कपात केल्याने भारत विकसित देशांच्या श्रेणीत सामील होईल. याशिवाय, जीएसटी रिटर्न सिस्टीम आणि इनपुट टॅक्स क्रेडिट पॉलिसीमध्येही बदल करणे आवश्यक आहे.

GST Collection
Tax: ४८ तासांत ही ५ कामे कराच, अन्यथा भरावा लागेल अतिरिक्त टॅक्स; खिशाला बसेल फटका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com