American Firebond Graham Walker Saam Tv
बिझनेस

American CEO: बॉस असावा तर असा! कंपनी विकली अन् कर्मचाऱ्यांना दिले कोट्यवधी रुपये; एका रात्रीत श्रीमंत

American Firebond Graham Walker CEO Shares Sale With Employees: अमेरिकेतील फायरबॉन्ड कंपनीच्या सीईओने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्याने कंपनी विकली परंतु सेलमधूल येणारे पैसे आपल्या कर्मचाऱ्यांना दिले आहेत. हे कर्मचारी एका रात्रीत कोट्यधीश झाले आहेत.

Siddhi Hande

अमेरिकन कंपनीच्या सीईओची कमाल

फायरबॉन्ड कंपनी विकून कर्मचाऱ्यांना दिले कोट्यवधी रुपये

कर्मचारी एका रात्रीत झाले कोट्यवधीश

अमेरिकेतली लुईझियाना येथील एका कंपनीच्या सीईओने अनोखी कामगिरी केली आहे. फायरबॉन्ड या कंपनीचे सीईओ ग्राहम वॉकर यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपली कौंटुबिंक व्यवसायातील कंपनी विकली. परंतु ही कंपनी फक्त विकली नाही तर त्यातून आलेले पैसे हे त्याने कर्मचाऱ्यांना दिले आहेत.

फायरबॉन्ड कंपनी विकून जी रक्कम मिळाली त्यातील १५ टक्के रक्कम ही कर्मचाऱ्यांना दिली. कंपनीच्या एकूण ५४० कर्मचाऱ्यांमध्ये त्यांनी २४० मिलियन रुपये वाटले. त्यांच्या फुल टाईम कर्मचाऱ्यांना त्यांनी हे पैसे दिले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या कर्मचाऱ्यांकडे कंपनीची कोणतीही इक्विटी नव्हती तरीही त्यांना पैसे देण्यात आली. (Graham Walker Firebond CEO)

कर्मचाऱ्यांना केला विचार

फायरबॉन्ड ही कंपनी Eaton ला विकली. कंपनीची विक्री करताना त्यांनी एक अट ठेवली होती की सेलच्या रक्कमेतील काही पैसे कर्मचाऱ्यांना दिले जातेल. ग्राहक वॉकर यांच्या मते, कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणासाठी त्यांना हे पैसे दिले आहेत.

कंपनीने प्रत्येक कर्मचाऱ्याला ४ लाख ४३ हजार डॉलर म्हणजे जवळपास ३.७ कोटी रुपये दिले. ही रक्कम एकत्र नाही तर पाच वर्षात दिली जाणार आहे. बोनसचे पैसे हे २०२५ जूनमध्ये देण्यात आले. (graham walker bonus employees)

कंपनीच्या निर्णयाचा कर्मचाऱ्यांना फायदा

कंपनीच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलले आहेत. कंपनीत १९९५ पासून एक महिला काम करत होत्या. त्यांना एकेकाळी प्रत्येक तासाला ५.३५ डॉलर रुपये मिळायचे. त्यांनी आज स्वतः चे कर्ज फेडून एक व्यवसाय सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan: मौत दिखे तो सलाम…; सलमान खान पुन्हा सैनिकाच्या भूमिकेत, 'बॅटल ऑफ गलवान'चा दमदार टिझर प्रदर्शित

Maharashtra Live News Update: रत्नागिरीत समुद्रात पोहताना एकाच कुटुंबातील तिघेजण बुडाले, एकाचा मृत्यू

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत शरद पवारांना मोठा धक्का; दोन बड्या नेत्यांचा अजित पवार गटात प्रवेश

Glass Bangles: काचेच्या बांगड्या खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' महत्त्वाच्या गोष्टी

BMC Election : मुंबईत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती का रखडली? कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT