Government Scheme Saam Tv
बिझनेस

Government Scheme: शाळेपासून ५ किमी लांब राहताय? विद्यार्थ्यांना ६००० रुपये मिळणार; राज्य सरकारचा निर्णय

Government Scheme For Students: उत्तर प्रदेश सरकारने विद्यार्थ्यांसाठी खास योजना सुरु केली आहे. या योजनेत शाळेपासून ५ किमी लांब राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ६००० रुपये मिळणार आहेत.

Siddhi Hande

केंद्र सरकारसोबतच विविध राज्य सरकारनेही अनेक योजना राबवल्या आहेत. काही योजना महिलांसाठी तर काही योजना विद्यार्थ्यांसाठी आहेत. उत्तर प्रदेश सरकारने विद्यार्थ्यांसाठी आता एक नवीन योजना राबवली आहे. या योजनेत शाळेपासून ५ किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतरावर राहणाऱ्या मुलांना आर्थिक मदत केली जाणार आहे. (Government Scheme)

ज्या विद्यार्थ्यांना ५ किमी किंवा त्यापेक्षा जास्त वेळ प्रवास करुन शाळेत यावे लागते, त्यांना ६००० रुपये दिले जाणार आहेत. त्यांना प्रवास भत्ता दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत यावे, तसेच शाळेत येताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत हजारो विद्यार्थ्यांचा प्रवास सोपा आणि सुखकर होणार आहे.

पात्रता

उत्तर प्रदेशमधील ही योजना बुंदेलखंड आणि सोनभद्र येथील विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ ९वी ते १२वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. जे विद्यार्थी सरकारी माध्यमिक शाळेपासून ५ किमी लांब राहतात त्यांना ही मदत मिळणार आहे.

पैसे कसे मिळणार?

या योजनेत पैसे थेट विद्यार्थ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा केले जाणार आहे. पहिला हप्ता ५ सप्टेंबरपर्यंत दिला जाणार आहे.

पीएम श्री योजनेत १४६ शाळेतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ग्रामीण आणि वंचित कुटुंबाना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

विद्यार्थ्यांना घोषणा पत्र भरावे लागणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांची शाळेत १० टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती असावी. या योजनेअंतर्गत जर आर्थिक मदत मिळाली तर विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Thursday : गुरुवारी त्रयोदशीला उजळणार, वाचा राशीभविष्य

Harshvardhan jadhav : रावसाहेब दानवे यांच्या जावयाला एका वर्षांचा तुरुंगवास, कारण काय? VIDEO

Hindustani Bhau: कोल्हापूरकरांना हिंदुस्तानी भाऊच्या शिव्या;भाऊला 'वनतारा'चा पुळका

High Court: फ्लॅट आकारनुसार द्यावा लागेल मेंटेनन्स; हायकोर्टाचा मोठा निर्णय

Dada Bhuse: शाळेत राष्ट्रगीतानंतर आता 'गर्जा महाराष्ट्र माझा' राज्यगीत गाणे बंधनकारक

SCROLL FOR NEXT