Post Office Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Scheme: या सरकारी योजनेत एकदा गुंतवणूक करा अन् दर महिन्याला ९२५० रुपये मिळवा; कसं? जाणून घ्या सविस्तर

Post Office Monthly Saving Scheme: पोस्ट ऑफिस मंथली सेव्हिंग योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला दर महिन्याला पेन्शन मिळणार आहे. या योजनेतील गुंतवणूकीवर चांगले व्याजदर मिळणार आहे.

Siddhi Hande

प्रत्येकजण आपले भविष्य सुरक्षित व्हावे यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करत असतात. पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे. पोस्ट ऑफिस मंथली इन्कम योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला दर महिन्याला पैसे मिळणार आहे. या सरकारी योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला भविष्यात कधीच आर्थिक अडचण भासणार नाही. (Post Office Monthly Saving Scheme)

पोस्ट ऑफिस मंथली इन्कम योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला ७.४ टक्के व्याज मिळणार आहे. या योजनेत तु्म्ही सिंगल अकाउंटमध्ये ९ लाख रुपये गुंतवू शकतात. तर जॉइंट अकाउंटमध्ये १५ लाख रुपये गुंतवणूक करु शकतात.

या योजनेत १८ वर्षांवरील नागरिक गुंतवणूक करु शकतात.या योजनेत अल्पवयीन मुलांच्या नावानेदेखील खाते उघडू शकतात. लहान मुले १० वर्षांचे झाल्यावर त्यांच्या नावावर अकाउंट उघडू शकतात. या योजनेत फक्त १००० रुपये गुंतवून अकाउंट उघडू शकतात. या योजनेत तुम्हाला चांगले व्याजदप मिळते. ही योजना पाच वर्षांनी मॅच्युअर होते. (Post Office Scheme)

या योजनेत जर तुम्हाला १५ लाख रुपये गुंतवले तर वर्षाला १,११,००० रुपये व्याज मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला महिन्याला ९२५० रुपयांची पेन्शन मिळणार आहे. या योजनेत सिंगल अकाउंटमध्ये जर तुम्ही ९ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला वर्षाला ६६,६०० रुपये व्याज मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला महिन्याला ५५०० रुपये मिळणार आहे.

पोस्ट ऑफिस मंथली स्कीममध्ये तुम्हाला बँकेच्या एफडीपेक्षा जास्त रिटर्न मिळतात.या योजनेत पाच वर्षानंतर तुम्हाला पैसे परत मिळतात. जर तुम्ही १ ते ३ वर्षाच्या कालावधीत पैसे काढवे तर २ टक्के रक्कम कापली जाईल. जर ३ ते ५ वर्षांच्या कालावधीत पैसे काढले तर १ टक्के रक्कम कापली जाईल.त्यामुळे या योजनेतील गुंतवणूक ही तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

SCROLL FOR NEXT