Government Scheme Saam Tv
बिझनेस

Government Scheme: सरकारी योजनांचे पैसे ९० दिवस बँकेत ठेवल्यास परत जमा होणार, लाडकीला फटका बसणार?

Government Scheme News: शासनाने सरकारी योजनांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता जर तुम्ही सरकारी योजनांमधील पैसे तीन महिने काढले नाही तर ते सरकारजमा होणार आहेत.

Siddhi Hande

सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

आता जर तुम्ही सरकारी योजनांमधील पैसे काढले नाही तर ते परत जाणार

शासनाचा मोठा निर्णय

केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. काही योजनांमध्ये लाभार्थ्यांना दर महिन्याला पैसे दिले जातात. दरम्यान,आता या योजनांबाबत शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.आता जर शासनाच्या कोणत्याही योजनेचे ३ महिन्याचे पैसे काढले नाही किंवा लाभार्थी घेऊन गेले नाही तर ती रक्कम शासनजमा केली जाणार आहे.

शासनाने सध्या महसूल सप्ताह राबवला आहे. त्यात संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना घरी जाऊन मंजुरीचे प्रमाणपत्र दिले आहेत. यावेळी शासनाच्या अनेक योजनांची माहितीदेखील दिली जात आहे.

सोलापूरमध्ये संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेचे १,५७,००० लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांची नावे दर महिन्याला वाढतच आहे. दरम्यान, या योजनेत थेट डिबीटीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. त्यासाठी सर्व लाभार्थ्यांना त्यांची कागदपत्रे संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात जमा करावी लागणार आहेत.यामध्ये १५ हजार लाभार्थ्यांनी अजून कागदपत्रे अपलोड केलेली नाही.

त्यामुळे हे लाभार्थी जोपर्यंत कागदपत्रे अपलोड करत नाही तोपर्यंत त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही, याबाबत शिल्पा पाटील तहसीलदार, संजय गांधी निराधार योजना, सोलापूर यांनी माहिती दिली आहे.

३ महिने रक्कम काढली नाही तर सरकारजमा होणार

शासनाच्या काही योजनांमध्ये लाभार्थ्यांना दर महिन्याला पैसे दिले जातात. दरम्यान, या योजनेत काही अडचणी येऊ नये, यासाठी कागदपत्रे जमा करण्यास सांगतात. तीन महिन्यापेक्षा जास्त काळ जर बँकेतील योजनेचे पैसे काढले नसतील तर ती रक्कम सरकारजमा केली जात आहे, असे शासनाचे आदेश आहेत.

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

लाडकी बहीण योजनादेखील सरकारी योजना आहे. या योजनेतील पैसेदेखील ३ महिने काढले नाही तर ते पैसे सरकारजमा होणार का असा प्रश्न आता अनेक महिलांना पडलेला असेल. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. फक्त संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेबाबत माहिती समोर आलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana Heavy Rain : बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस; शेताला आले तलावाचे स्वरूप, घरातही शिरले पाणी

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Box Office: शनिवारी 'महावतार नरसिंह'ने मारली बाजी; 'सैयारा', 'सन ऑफ सरदार २'ने केली कमाई

Mumbai: खबरदार! कबुतरांना दाणे टाकाल तर भरावा लागेल ५०० रुपयांचा दंड, मुंबई महानगर पालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना जुलैचे १५०० आले नाहीत? ही ७ कारणे असू शकतात

SCROLL FOR NEXT