Mofat Pithachi Girni Yojana Saam tv
बिझनेस

Government Scheme: महिलांसाठी सुवर्णसंधी; मोफत पीठ गिरणी योजना सुरू, असा करा अर्ज

Mofat Pithachi Girni Yojana: महिलांसाठी राज्य सरकारनं पीठ गिरणी योजना सुरू केलीय. महिलांसाठी सरकार अनेक योजना राबवत असते.

Bharat Jadhav

ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना 2024 सुरू केलीय. या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी देणे हा आहे. महिलांना सक्षमीकरणासाठी शासन अनेक प्रकारच्या योजना राबवत असते. या योजनांपैकी ही एक योजना आहे.

महिलांना आर्थिक सहकार्य मिळावं, यासाठी राज्य सरकार लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मदत करते. राज्यातील महिलांना स्वतःचा व्यवसाय उभारुन त्यांना स्वावलंबी बनता यावे, यासाठी पीठ गिरणी योजना सुरू करण्यात आलीय.

पात्रतेच्या अटी आणि कागदपत्रांची यादी

अर्जदार महिला महाराष्ट्रातील रहिवासी असली पाहिजे

अर्जदारचे वय: 18 ते 60 वर्ष असावे.

अनुसूचित जाती किंवा जमातीतील असणं आवश्यक

वार्षिक उत्पन्न ₹1,20,000 पेक्षा कमी असले पाहिजे.

अर्जदाराच्या नावे बँक खाते असणं आवश्यक

कागदपत्रे

आधार कार्ड

जात प्रमाणपत्र

उत्पन्नाचा दाखला

रेशन कार्ड

रहिवासी प्रमाणपत्र

बँक खात्याचा तपशील,

फोटो,

BPL कार्ड (असल्यास), शासनमान्य विक्रेत्याचे कोटेशन.

कमी गुंतवणुकीत व्यवसायाची संधी

शासन गिरणी खरेदीसाठी 90% अनुदान देत असते तर अर्जदाराला केवळ 10% रक्कम महिलांना भरावी लागते. अगदी कमी गुंतवणुकीत महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी आहे. या व्यवसायातून दररोज धान्य दळण्याच्या कामामुळे नियमित उत्पन्न मिळू शकते.

अर्ज कसा करायचा?

ज्या महिलांना या योजनेला लाभ घ्यायचा असेल त्या महिलांनी स्थानिक पंचायत समिती किंवा जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज करावा. अर्ज सादर केल्यानंतर पडताळणी केली जाते. त्यानंतर पात्रतेनुसार अनुदान दिलं जाते. अनुदानाची रक्कम महिलेच्या बँक खात्यात जमा केली जाते.

येथे भरा अर्ज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cholesterol Diet Mistakes: कोलेस्टेरॉल कमी करताय, पण 'ही' एक सामान्य चूक ठरू शकते घातक; डॉक्टरांनी दिला महत्वाचा सल्ला

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावती दौऱ्यावर

Beed Politics: मोठी बातमी! बीडमध्ये नवं राजकीय समीकरण, राष्ट्रवादी- शिवसेनेची MIM सोबत युती

Tara Sutaria-Veer Pahariya Breakup: तारा सुतारिया-वीर पहाडिया यांचा ब्रेकअप? गायकाला किस करणं पडलं महागात

Viral Video : नागमणी घेतल्याशिवाय जाणार नाही वाटतं...; महामार्गावर मध्यरात्री तरुणींचा नागीण डान्स, नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT