Government Scheme Saam Tv
बिझनेस

Government Scheme: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळतात १२००० रुपये; कसं? योजनेसाठी पात्रता काय? जाणून घ्या सविस्तर

Government Scheme For Farmers In Maharashtra: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दरवर्षी १२००० रुपये दिले जातात. केंद्राच्या पीएम किसान आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेअंतर्गत हे पैसे दिले जातात.

Siddhi Hande

केंद्राने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील काही योजना शेतकऱ्यांसाठी तर काही योजना मुलींसाठी राबवल्या आहेत. भारतातील सर्वाधिक लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने काही खास योजना राबवल्या आहे. यात केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली आहे. याचसोबत महाराष्ट्र सरकारनेही नमो शेतकरी योजना राबवली आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत १२००० रुपये दिले जातात. या योजनेतून मिळालेल्या रक्कमेतून शेतकऱ्यांना शेतीसाठी मदत होते. या योजनेत दर तीन हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात. प्रत्येक घरातील एका शेतकऱ्याला योजनेचा लाभ मिळतो. या योजनेत लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त ५०० रुपये दिले जातात.

नमो शेतकरी योजना (Namo Shetkari Yojana)

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना राबवली आहे. या योजनेत ६००० रुपये दिले जातात. दरवर्षी ३ हप्त्यांमध्ये हे पैसे दिले जातात. या योजनेचा लाभ घेणारा शेतकरी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. त्याच्याकडे शेती असणे गरजेचे आहे. शेतकऱ्याचे नाव कृषी विभागात रजिस्टर असायला हवे. तसेच शेतकऱ्याचे बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक असायला हवे.तसेच योजनेच्या लाभार्थ्यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेत रजिस्ट्रेशन केलेले असावे.

पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Sanman Nidhi Yojana)

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी खास पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रुपये दिले जातात. त्यामुळे नमो शेतकरी योजनेचे ६००० आणि पीएम किसान योजनेचे ६००० रुपये असे एकूण १२००० रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटला जमा होतात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News: कोळसेवाडी व विजयनगरमध्ये मध्यरात्री गाड्यांची तोडफोड; कल्याणमध्ये भीतीचं वातावरण|VIDEO

Nashik: धक्कादायक! घरी व्यायाम करताना कोसळला; १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा हार्ट अटॅकनं मृत्यू

Sindhudurg Tourism : ना गर्दी, ना गोंधळ; शांत निसर्गरम्य वातावरणात घ्या 'या' धबधब्याचा आनंद

PF Maturity Calculator : १०, १५, २० वर्षे नोकरी केल्यावर खात्यात पीएफ किती जमा होईल? वाचा

Maharashtra Live News Update: पांडुरंगांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत फडणवीसांना कानात सांगावा - बच्चू कडू

SCROLL FOR NEXT