देशातील नागरिकांच्या भल्यासाठी सरकार नवनवीन उपाययोजना राबवत असतात. नागरिकांना आर्तिदृष्ट्या सक्षम बनवणे हे यामागचे मुख्य उद्धिष्ट असते. देशातील तरुणाईचा रोजगार वाढवण्यासाठी, त्यांना स्वतः चा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार नेहमीच पाठिंबा देत असते. यासाठी काही योजना राबवल्या आहेत. तरुणांसाठी या योजना खूप फायदेशीर ठरतील. (Latest News)
पंतप्रधान रोजगार योजना
देशातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार मदत करते. या योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना व्यवसाय सुरु करण्यासाठी कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करुन दिले जाईल. PMRY कर्ज अंतर्गत प्रशिक्षणासाठी बोलावले जाईल. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सरकार कर्ज देईल. यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करु शकतात.
आत्म निर्भर भारत योजना
कोरोनाच्या काळात अनेक लोकांना आर्थिक अडचणी आल्या होत्या अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. या परिस्थितीत तरुणांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सरकारने आत्मनिर्भर भारत योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत नोकरीपासून व्यवसायांपर्यंत सर्व क्षेत्रात तरुणांना रोजगार उपलब्ध करुन दिला जाईल.
प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना
सरकारने २०१५ साली पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना सुरु केली होती. या योजनेतून लघु उद्योजक आणि तरुणांना स्वतः चा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिले जाणार आहे. ज्या तरुणांना स्वतः चा व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांना या योजनेअंतर्गत १० लाख रुपयांचे मुद्रा कर्ज मिळू शकते.
पीएम वाणी योजना
सध्याच्या काळात इंटरनेट काळाजी गरज बनली आहे. सरकार देशाला डिजिटल बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी सरकारने पीएम वाणी योजना सुरू केली आहे. पीएम फ्री वायफाय योजनेमुळे सार्वजनिक वायफायचे मोठे नेटवर्क तयार होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.