Government Scheme For Students Saam Tv
बिझनेस

Government Scheme For Students : राज्य सरकारची विद्यार्थ्यांसाठी खास योजना; 20 रुपयांत मिळणार 5 लाखांपर्यंत फायदा

Governments Scheme : महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी खास विमा योजना जाहीर केली आहे.

कोमल दामुद्रे

Students Insurance Scheme :

विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून अनेक नवीन योजना राबवल्या जातात. स्कॉलरशीपपासून ते चांगल्या भविष्यासाठी अनेक सरकारी योजना राबविल्या जातात. अशातच गरजू विद्यार्थ्यांना केंद्र आणि राज्य सरकार आर्थिक बाबतीतही मदत करते.

महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी खास विमा योजना जाहीर केली आहे. शाळकरी मुलांपासून ते पदवी पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबविण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांना देखील लाभ घेता येणार आहे.

या योजनची प्रीमियम सुविधा २० रुपयांपासून सुरु होईल. राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने १६ ऑक्टोबर रोजी शासनाने निर्णय जाहीर केला आहे. याबाबतचे वृत्त पीटीआयने प्रसिद्ध केले आहे. या निर्णयानुसार ही योजना सरकारी किंवा अनुदानित महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी असेल.

1. प्रीमियमसाठी किती पैसे भरावे लागतील?

या विमा योजनेसाठी २० रुपये प्रीमियम भरुन एका विद्यार्थ्याला (Students) १ लाख रुपयांचे वैयक्तिक अपघाती विमा संरक्षण मिळेल. ही पॉलिसी वर्षभरासाठी लागू करण्यात आली आहे. तसेच जर ६२ रुपयांचा प्रीमियम घेतल्यास ५ लाखांचा कव्हरेज वर्षभरासाठी मिळेल. यातच अपघातानंतर उपचारांसाठी २ लाख रुपयांपर्यंतचे मेडिकल कव्हरेज हवे असल्यास ४२२ रुपये प्रीमियम भरावा लागेल असे म्हटले आहे.

2. विमा कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार?

विमा (Insurance) घेणारा विद्यार्थी हा प्राथमिक विमाधारक सदस्य असून महाराष्ट्राच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत संलग्न, संबध्द, प्रशासित, वर्गीकृत असलेल्या महाविद्यालये, संस्था किंवा विद्यापीठांमध्ये शिकणारा असावा. तसेच याचा प्रवेश अर्ज हा शाळा आणि कॉलेजवर अवलंबून असेल.

3. कोणत्या बँकेतून मिळणार विमा ?

ICICI Lombard इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि नॅशनल इन्शुरन्स कॉर्परेशन लिमिटेड कंपनीची निवड या योजनेसाठी करण्यात आली आहे. २० ते ४२२ रुपयांच्या प्रीमियम असणाऱ्या योजना असेल तर ६२ रुपये प्रीमियम असलेला पाच लाखांचा वैयक्तिक अपघाती विमा नॅचरल इन्शुरन्स कंपनी ऑफर करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women Travel Tips: परदेशी प्रवास करताना महिलांनी कोणते कपडे घालू नयेत?

Coconut Water : नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? 99% लोकांना माहीत नसेल

Restaurant style sambar masala: घरच्या घरी कसा बनवाल साऊथ इंडियन रेस्टॉरंट स्टाईल सांबार मसाला

Stampede Safety Tips : चेंगराचेंगरी झाल्यास कोणती खबरदारी घ्यावी?

Tamanna Bhatia:'आज की रात' फेम तमन्ना भाटियाचा नवा लूक, फोटो तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT