PPF Scheme Google
बिझनेस

PPF Scheme: दररोज ४१६ रुपयांची गुंतवणूक करा अन् करोडपती व्हा; काय आहे केंद्राची PPF योजना?

PPF Scheme Benefits: सरकार नागरिकांसाठी अनेक योजना राबवतात. यातील एक योजना म्हणजे पब्लिक प्रोविडंट फंड. पीपीएफ योजनेत नागरिकांना भरघोस व्याजदर मिळते.

Siddhi Hande

प्रत्येकजण आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व्हावे, यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. यामध्ये अनेक सरकारी योजना आणि पोस्ट ऑफिसच्या योजनांचा समावेश आहे. सरकारची पब्लिक प्रोविडंट फंड ही योजना खप फायदेशीर आहे. या योजनेत ग्राहकांना चांगले व्याजदर मिळते.या योजनेत तुम्ही रोज ४१६ रुपये जमा करुन काही वर्षात करोडपती होऊ शकतात.

PPF Scheme ही योजना फायदेशीर आहे. यात गुंतवणूकदारांना ७.१ टक्के व्याजदर मिळते. या योजनेत तुम्ही कमीत कमी ५०० रुपयांची गुंतवणूक करु शकतात. तर जास्तीत जास्त १.५ लाख रुपयांची गुंतवणूक करु शकतात. या योजनेचा मॅच्युरिटीचा कालावधी १५ वर्षांचा आहे. यामध्ये ५-५ वर्षांचा कालावधी वाढवला जाऊ शकतो. या योजनेत तुम्ही मॅच्युरिटीच्या कालावधीनंतर करोडपती होऊ शकतात.

या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही रोज ४१६ रुपयांची बचत करा. त्यामुळे प्रत्येक महिन्याला १२,५०० रुपये जमा होतील. वर्षाला १.५ लाख रुपये जमा होतील.

जर तुम्ही या योजनेत २५ वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुम्ही १ कोटी रुपयापेक्षा जास्त रुपये मिळतील. या योजनेत ७.१ टक्के व्याजद लागू होते. त्यानुसार २५ वर्षानंतर तुम्हाला १,०३,०८,०१५ रुपये मिळतील. पीपीएफ योजनेत तुम्हाला गुंतवणूकीवर अनेक फायदे मिळतात.या योजनेवर 80C कलमाअंतर्गत कर लागू हत नाही.त्यामुळे मॅच्युरिटीनंतर मिळणारी रक्कम ही करमुक्त असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महाराष्ट्रात साखर उद्योगासाठी ३ हजार कोटींचे प्रकल्प - अमित शहा

खासदार ओमराजे निंबाळकरांना ठाकरेंचा फोन? कॉलवर नेमकं काय बोलणं झालं?

भाजपकडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाची ऑफर? ऑपरेशन टायगरनंतरच्या त्या एका ट्विटनं राजकारणात खळबळ

Gaganbawada Waterfalls : गगनबावड्याच्या हिरव्यागार दऱ्यांतील ५ निसर्गरम्य धबधबे, पाहा पावसाळ्यात खुलणारे नंदनवन!

PM Kisan 23rd installment : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! बँक खात्यात २००० रुपये जमा, स्टेप बाय स्टेप असं करा चेक

SCROLL FOR NEXT