Government Apps Saam TV
बिझनेस

Government Apps: सरकारी कामं चुटकीसरशी होतील पूर्ण; वेळ आणि पैसे वाचवणारं 'हे' अ‍ॅप तुमच्या फोनमध्ये आहे का?

Ruchika Jadhav

सरकारी कामात तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो का? मात्र आता काळजी करु नका कारण सरकारने नागरिकांची कामे झटपट पूर्ण व्हावीत यासाठी काही अ‍ॅप्स सुरू केले आहेत. सरकारचे हे अ‍ॅप्स तुमच्या कामासाठी खुप फायदेशीर ठरणार आहेत. त्या अ‍ॅप्सच्या मदतीने सरकारी कामांसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे तुम्हाला सहज उपलब्ध होतील.

अनेक कामात तु्म्हाला तुमची ओळखपत्रे दाखवावी लागतात. त्यात आपण कुठे जन्माला आलो त्याचेही ओळखपत्र दाखवावे लागते. शाळा-महाविद्यालयांमध्ये, ऑफीसमध्ये, मोठ्या हॉटेलांमध्ये, काही सरकारी कामांमध्ये, परदेशी जाण्यासाठी अशा सर्व कामांमध्ये ओळखपत्र महत्वाची असतात. आपण जेव्हा नविन कागदपत्र काढायला जातो तेव्हा आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

आपण आता डिजीटल युगात राहतो. या डिजीटल माध्यमांमुळे एक वेगळं जग सुद्धा तयार होऊ शकतं. त्यातच आपण स्मार्ट फोनचा वापर करतो. स्मार्ट फोनचा वापर केल्यामुळे अनेक कामं घरबसल्या आपण करू शकतो.

कागदपत्रे तयार करण्यासाठी आपल्याला सरकारी कार्यालयांमध्ये जावे लागते. मात्र आता स्मार्टफोनवरच ती कामं होऊ शकतात. सरकारनं सर्व भारतीयांसाठी काही मोफत अ‍ॅप्स दिलेत. त्यांचा वापर करून आपण पाहीजे त्यावेळी ते कागदपत्र वापरू शकतो. त्या अ‍ॅप्सची नावं पूढील प्रमाणे आहेत.

डिजिलॉकर अ‍ॅप

सरकारने डिजिलॉकर अ‍ॅपमध्ये आपली कागदपत्रे साठवून ठेवण्याची सुविधा केली आहे. ते अ‍ॅप आपण कधीही वापरू शकतो. त्यात ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, पॅन कार्ड, शाळेचे गुणपत्रक, शिधापत्रिका या सगळ्या कागदपत्रांना आपण या अॅपमध्ये साठवू शकतो.

उमंग अ‍ॅप

आधार कार्ड, पासपोर्ट, आणि ईपीएफओ ही कागदपत्रे आपण उमंग अ‍ॅपवरुन मिळवू शकतो. या अॅपमध्ये असंख्य कामं करु शकतो. हे असं एकमेव अॅप आहे.

MParivahan App

वाहनाशी संबधीत कागदपत्रांची संपूर्ण माहिती आपण MParivahan app या अ‍ॅपवर मिळवू शकतो. ही कागदपत्रे आपण डाऊनलोड सुद्धा करु शकतो. याशिवाय पैशांची देवाणघेवाण आपण यात करू शकतो.

MyGov

ज्या काही योजना येत असतात त्यांची माहीती मिळवण्यासाठी आपण MyGov अ‍ॅपचा वापर करू शकतो. या अ‍ॅपच्या मदतीने देखील तुमची अनेक सरकारी कामे काही मिनिटांत पूर्ण होतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News : घरात प्रिंटरच्या माध्यमातून बनावट नोटा छपाई; पोलिसांची १४ ठिकाणी छापेमारी, एकास अटक

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Ramayana Movie : 31 वर्षांनंतर पुन्हा येणार 'रामायण' थिएटरमध्ये, 'या' चार भाषांमध्ये होणार प्रदर्शित

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

SCROLL FOR NEXT